कै.हि.मो.करोडपती माध्यमिक विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

कै.हि.मो.करोडपती माध्यमिक विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळ,चोपडा संचलित, कै.हि.मो.करोडपती, माध्यमिक विद्यालय चोपडा जि.जळगांव चा सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक-१७-१-२०२० (वार-शुक्रवार) रोजी उत्साहात संपन्न झाला.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष सोमनाथ डोभा बडगुजर हे होते तर कार्यक्रमाचे उदघाटन लोकसंघर्ष मोर्चा चे जळगांव जिल्हा सरचिटणिस संजीव शिरसाठ यांचे शुभहस्ते संपन्न झाले.संस्थेचे सचिव व्ही.एच.करोडपती तसेच मुख्याध्यापिका एस.व्ही.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रास्तविक मंगेश भोईटे यांनी केले. याप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध लोकनृत्य,आदिवासी-कोळी नृत्य,विविध सामाजिक समस्या शिक्षण,बालविवाह,अंधश्रद्धा याविषयांवर प्रबोधनपर नाटिका,एकांकीका,समुह नृत्यांच्या मनमोहक अविष्कारांचे सादरीकरण केले.यातुन उपस्थित श्रोत्यांची दाद मिळवली.
परिसरातील पालक नागरिकांचा कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन सहभागी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करुन प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक-शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एन.बी.बडगुजर व आर.आर.बडगुजर यांनी केले.तर आभारप्रदर्शन ए.पी.बडगुजर यांनी केले. आणि कार्यक्रमाला व्ही.बी.साळुंखे,पी.सी.बडगुजर,एस.टी.बोरसे,सी.पी.बडगुजर,सुनिल बडगुजर तसेच विलास सनेर यांनी सहकार्य केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More