अमळनेर येतील युवकाचा चोपडा येत असताना दुर्दैवी मृत्यू
अमळनेर येथील तांबापुरा येथील विवेक लक्ष्मण नाथ वय २० व राज किशोर पाटील हे दोन्ही साडे चार वाजेचा सुमार अमळनेर येथून बुधगाव मार्गे चोपडा येत असताना अकुलखेडे येथे विवेक लक्ष्मण नाथ हा दुचाकी चालवत असताना त्याला छातीत दुखत असल्याचे त्याने त्याचा सोबत असलेल्या राज किशोर पाटील याला सांगितले व त्यांनी अकुलखेडा येथे सहा वाजता चहा पिण्यासाठी थांबले असता चहा पित असताना विवेक नाथ याला अचानक चक्कर येऊन कोसळला व जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती संबंधितांना मिळताच चोपडा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली असून विवेक नाथ याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. विवेक नाथ याचा मृत्यू हृदयविकाराचा धक्का बसल्याने झाला असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे .


