चोपडा माजी नगर अध्यक्ष सह माजी नगर सेवकांचा भाजपात प्रवेश# जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न…
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीचा पार्श्वभूमीवर आज चोपडा शहरातील दिग्गजांचा भाजपात प्रवेश साकेगाव ता. भुसावळ येथे चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी नगराध्यक्ष सौ.मनिषाताई चौधरी , नगर अध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवार साधना नितीन चौधरी ,माजी नगर सेवक सौ.कृष्णा वसंत पवार, मीनाबाई प्रकाश शिरसाठ,माजी जी प सदस्य नीलिमा पाटील


माजी नगरसेवक जीवन चौधरी जितेंद्र तात्यासाहेब देशमुख ,सीताराम तुकाराम पारधी , रणजीत (राणु) देशमुख, युवराज चौधरी , मनोज चित्रकथी ,मितेश मुकुंद भावसार ,अजय पालीवाल ,यांचा सह शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, खासदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते !


