चोपडा येथील संजीवनी नगर भागातून सोनसाखळी घेऊन चोरटे पसार # चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

चोपडा येथील संजीवनी नगर भागातून सोनसाखळी घेऊन चोरटे पसार # चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दिनांक ०४ रोजी सायकाळी ७ वाजेच्या सुमारास सुनिता पुरुषोत्तम साठे वय ४८ व त्यांची मुलगी कुमारी गायत्री चोपडा शहरातील संजीवनी नगर भागातील प्रगती हॉस्पीटल समोरुन रोडने पायी जात असतांना  एका विना नंबरच्या काळ्या रंगाची  पल्सर मोटर सायकल वरील दोन अज्ञात इसमांनी त्याच्या जवळ येउन त्याच्या गळयातील १८ ग्राम सोन्याची  व किमंतीची सोन्याची माळ हि गळ्यातुन बळजबरीने हिसकाउन नेली म्हणून चोपडा शहर पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 304 (2), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना  सी.सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संशयित आरोपी हे भुसावळ परिसरातील असल्याचे शक्यता वर्तवण्यात येते आहे पुढील तपास चोपडा पोलिस निरीक्षक मधुकर सावळे यांचा मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More