मोहिदा गावात बिबट्याची दहशत,म्हशीची पारडू व वासरू केले फस्त : आज पहाटेची घटना : गावकऱ्यांनमध्ये भीती.

मोहिदा गावात बिबट्याची दहशत,म्हशीची
पारडू व वासरू केले फस्त : आज पहाटेची
घटना : गावकऱ्यांनमध्ये भीती.

चोपडा ( प्रतिनिधी )—–
मोहिदा (ता.चोपडा) गावात मागील काही महिन्यांपासून बिबट्याने दहशत निर्माण केली होती.परंतु पुन्हा बिबट्याचा वावर वाढला असून आज मोहिदा गावाच्या खळवाडीत येऊन
बांधलेले म्हशीचे पारडू व एक वासरू फस्त केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळीच उघडकीस आल्याने मोहिदा परिसरात प्रचंड खडबळ उडाली आहे.आज रात्री
बिबट्याने हजेरी लावल्याने गावकऱ्यांमध्ये
घबराट पसरली असून अजून पर्यंत वनविभागाकडून बिबट्याची दखल घेतली गेली नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आज शुक्रवार रोजी मोहिदा येथील शेतकरी सुनील भगवान पाटील यांच्या खळ्यात दावणीला बांधलेले म्हशीचे पारडू व गायीचे वासरू बिबट्याने फस्त केला आहे.नेहमी प्रमाणे पहाटे उठून म्हशीचे दूध काढण्यासाठी शेतकरी अनेर नदी काठाजवळील आपल्या खळ्यात गेले असता बिबट्याने दोन जनावरे फस्त केल्याची घटना आज सकाळीच ६ वाजता उघडकीस आली.बिबटया गावात आल्याने मोहिदा गावासह परिसरात प्रचंड खडबळ उडाली.या परिसरात मागील काही महिन्यांपासून बिबट्या निदर्शनास आल्याची घटना अधून मधून घडत आहे.आज शुक्रवारी बिबट्याने दोन जनावरे फस्त केल्याची घटना घडली.वनविभागाने तात्काळ पंचनामा करून संबधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे
मोहिदा परिसरात बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून,दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान मोहिदा परिसरातील शेती शिवारात,जंगलात दिवसा मोकाटपणे बिबट्या फिरत असल्याचे अनेकदा शेतकर्‍यांच्या निदर्शनास आले आहे.बिबट्यास पकडण्यासाठी वन विभागाने तातडीने सापळा लावून बिबट्या चा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी मोहिदा व परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More