गावविकासाचा पंचवार्षिक आराखडा तयार करण्यासाठी प्रशिक्षण सुरू

चोपडा
येथे आमचा गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे दोन दिवशीय प्रशिक्षण सुरू झाले.
१८ रोजी सकाळी १० वाजता चोपडा येथील अग्रसेन भुवनात चोपडा पंचायत समिती मार्फत गावविकासासाठी १५ व्या वित्त आयोगातून गावाचा विकास थेट निधीतून करण्यासाठी शासनाच्या ‘आमचा गाव आमचा विकास उपक्रम’ ५.२ अंतर्गत सन २०२०- २१ वार्षिक, व सन २०२०-२१ ते सन २०२४-२५ या पंचवार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणेकामी पंचायत समिती चोपडा मार्फत तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्यात गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षण उदघाटन अडावदच्या लोकनियुक्त सरपंच भावना माळी यांचे हस्ते संत गाडगेबाबा व ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर सोनवणे यांचे हस्ते महात्मा गांधी यांची प्रतिमा पूजन करून करण्यात आले.
उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना जिल्हा प्रविण प्रशिक्षक सागर धनाड यांनी प्रशिक्षण दिले. यात आरोग्य, शिक्षण, उपजीविका , महिला, मागासवर्गीय व इतर असा विकास आराखडा तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक विस्तार एस.बी.कोळी यांनी केले. तर सूत्रसंचालन विस्तार अधिकारी जितेंद्र पाटील विस्तार अधिकारी यांनी केले.
सर्व प्रशिक्षणसाठीचे नियोजन ग्रामपंचायतीचे विस्तार अधिकारी जगन्नाथ पाटील यांनी केले.
