मामलदे येथील गावकरी माकडाचे बारा दिवस सुतक पाळत आहेत

मामलदे येथील गावकरी माकडाचे बारा दिवस सुतक पाळत आहेत
अत्यंविधि ,उत्तरकार्य ,दशक्रिया गावपंगतचे नियोजन


चोपडा ( प्रतिनिधी) — तालुक्यातील मामलदे गावातील गोपाळ राजाराम महाजन यांच्या शेतात दि १४ रोजी बजरंग बलीचा अवतार माकडं जखमी होऊन शेतात आला होता परंतू तो माकड त्याच शेतात गतप्राण झाला गावकऱ्यांना ही बातमी कळताच गावकऱ्यांनी तोबा गर्दी केली तदनंतर बजरंग बलीच्या अवतार असल्याने गावकरी भाऊक होऊन माकडाचा अंत्यविधी उत्तरकार्य दशक्रिया विधी करण्याचे एक मुख्य निर्णय घेण्यात आला

अंत्यविधीसाठी डोली सजविण्यात आली माकडाच्या पार्थदेहावर अनेकांनी फुलमाळा व शाल अर्पण केल्या यावेळी मुखाग्नि देण्यासाठी सुरेश गोपाळ महाजन यांनी पुढाकार घेतला बारा दिवसाच्या संपूर्ण गावावर दुखवटा असल्याने गावात रोज रात्री भजन सुरू असते दिनांक 23 रोजी दशक्रिया करण्याचे आयोजन करण्यात आले दशक्रियाच्या विधीत अनेकजण केस देणार आहेत तसेच दि २५ ला संपूर्ण गावाला उत्तरकार्या निमित्त जेवण ठेवले आहे वरील सर्व कार्यक्रमात गावातील प्रत्येक घटकाने सहभाग घेतला आहे तसेच चोपडा तालुक्यातील ही पहिलीच घटना होय व ते भाग्य आम्हा मामलदा वासीयांना मिळाल्याने आम्ही भाग्यवान समजत आहोत असे भारत इंगळे यांनी माहिती देताना सांगितले या कार्यासाठी गावातील भारत पितांबर इंगळे
अनिल काशिनाथ पाटील ,राजेंद्र भागवत पाटील,
प्रकाश लोटन पाटील, विजय श्रीराम पाटील, खुशाल भाऊराव पाटील, पुंडलिक रघुनाथ पाटील, कल्याण गजमल पाटील,चंपालाल शामराव पाटील, शांताराम देवराम पाटील, प्रल्हाद ओंकार पाटील, ज्ञानेश्वर आत्माराम जाधव, सुनील ईश्वर पाटील, चंद्रकांत लखीचंद महाजन आदी मेहनत घेत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More