आर्किड इंटरनेशनल स्कूल चोपड़ा ची शिक्षक पालक सभा संपन्न

यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल चोपडा येथे आज ओपन हौस डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटिल , शाळेचा प्राचार्या मिस परमेश्वरी , पालक प्रतिनिधी श्री पंकज पाटील सौ. सुवर्णा लवटे आदी उपस्थित होते.गुलाब पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.सुरुवातीला शाळेच्या प्राचार्या मिस परमेश्वरी यांनी शाळेच्या उपक्रमांबाबत पालकांशी संवाद साधला .अध्यक्ष या नात्याने डॉ. राहुल पाटील यांनी उपस्थित सर्व पालकांना आजच्या काळात विद्यार्थी व पालक यांचे नाते कशा प्रमाणे असायला हवे , पालकांच्या जबाबदाऱ्या काय याविषयी मार्गदर्शन केले, तसेच आपल्या शरीराला पाण्याची किती गरज असते तसेच शाळेत जेवणाची घंटा असते त्या प्रमाणे पाण्याची सुद्धा घंटा असावी जेणे करून विद्यार्थ्यांची शरिरातील पाण्याची गरज पूर्ण होण्यास मदत होईल .यासाठी पालक प्रतिनिधी म्हणून श्री यशवंत पाटील यांनी घंटा वाजवून पाणी घंटेचे लोकार्पण केले.यावेळी सर्वांनी पाणी पिऊन नवीन ऐतिहासिक घटनेचा आनंद घेतला. इयत्ता ३री च्या विद्यार्थ्यांनी मोबाईल वापराचे दुष्परिणाम या विषयावर छोटी नाटिका सादर केली. पालकांसाठी आयोजित फणी गेम , संगीत खुर्ची यासारख्या खेळांमध्ये पालकांनी सहभाग नोंदवून आनंद घेतला. प्रत्येक पालकांना आपल्या पाल्यांचे सहामाही परीक्षेचे पेपर्स आणि निकाल पत्र दाखवण्यात आले. यावेळी सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश वाघ तर आभार प्रदर्शन दिपाली पाटील यांनी केले याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते.
