राज्यात महायुतीचेच सरकार येणार : मुनगंटीवार, गोड बातमी म्हणजे “शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार” संजय राऊत

राज्यात महायुतीचेच सरकार येणार : मुनगंटीवार

मुंबई : शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचे सांगून उद्या गुरूवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने भाजपाने शिवसेनेवर दबावतंत्राचा वापर केल्याची चर्चा आहे.दुसरीकडे उद्या शिवसेनेच्या आमदारांची तातडीची बैठक मातोश्रीवर होणार असल्याने या बैठकीत होणा-या सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुनगंटीवारांची गोड बातमी म्हणजे “शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार” संजय राऊत

मुंबई : सत्ता स्थापनेचा तिडा कायमच असून,अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात महायुतीचेच सरकार येणार असून, लवकरच गोड बातमी समजेल असे संकेत दिले असतानाच मुनगंटीवार यांची गोड बातमी म्हणजे राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आहे असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आज झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतनंतर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार असल्याचे सांगत राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचा दावा केला. मुनगंटीवार यांच्या या घोषणेनंतर त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही चांगली गोष्ट असल्याचे सांगितले. राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा भाजपा करणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापन केले पाहिजे असे सांगून,भाजपा राज्यपालांना भेटून १४५ आमदारांची यादी देणार असेल तर ती आनंदाची बाब असल्याचे राऊत म्हणाले.भाजपा आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले असले तरी राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा दावा राऊत यांनी केला. सुधीर मुनगंटीवार यांनी लवकरच गोड बातमी समजेल असे म्हणाले आहेत. ती गोड बातमी म्हणजे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More