मालट्रक ओव्हरटेक केल्याच्या वादातून चोपडा शहर पोलिसात परस्पर विरोधात गुन्हे दाखल

मालट्रक ओव्हरटेक केल्याच्या वादातून चोपडा शहर पोलिसात परस्पर विरोधात गुन्हे दाखल
चोपडा प्रतिनिधी :—


चोपडा शहरातील माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांचे राहत्या घरासमोर सेवा गॅरेज जवळ सार्वजनिक रस्त्यावर अजमतुल्ला खान रहमतुल्ला खान (गॅरेज मेकॅनिक) तसेच त्याच्या पुतण्या जुबेर शेख ,शेख जाकीर शेख सलीम याना मालट्रक चालक गुलाब बाबा याने मालट्रक ओव्हरटेक केल्याचे कारणावरून हुज्जत बाजी करून मेहमूद शेख शफी , साबीर शेख नबी, आसिफ शेख नबी ,सईद शेख अब्बा यांनी बेकायदा गर्दी करून शिवीगाळ करून चापटा बुक्यांनी व काठ्यांनी फिर्यादीस व त्याच्या पुतन्याना पायावर व पाठीवर मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

म्हणून चोपडा शहर पोलिसात भादवि कलम 143 ,144 ,147 ,149 ,294, 324, 323 ,504, 506 मुंबई पोलीस ऍक्ट 37 (1) ,(3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसरा गुन्हा करीम ऊर्फ कालू रसूल अरब यांच्या फिर्यादीवरून अल्ताफ शेख रंगा, शहजाद खान शेरखान, शेख जाकीर शेख सलीम, अजमत उल्ला खान रहमतुल्ला खान ,मजहर उर्फ मज्जू शेरा , शेख सलमान शेख सलीम यांच्याविरुद्ध गैर कायद्याची मंडळी जमून फिर्यादीस अश्लील शिव्या देऊन मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून पोलिसात भादवि कलम 143 ,144, 147 ,149 ,294 ,324 ,323, 504, 506 मुंबई पोलीस 137 (1) ,(3 ) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे करीत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More