अवैध वाळू वाहतूकीविरुद्ध चोपडा तहसिलदारांची धडक कारवाई , एकाच रात्री केली चार वाहनांवर कारवाई …

अवैध वाळू वाहतूकीविरुद्ध चोपडा तहसिलदारांची धडक कारवाई , एकाच रात्री केली चार वाहनांवर कारवाई …


चोपडा प्रतिनिधी—

चोपडा तालुक्यात अवैध वाळू वाहतूक दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असताना तालुक्याचे तहसीलदार अनिल गावित यांनी विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रात्रीच्यावेळी धाडसत्र सुरू केले आहे. सदर धाडसत्रात लासुर – मराठे रस्त्यावर विनापरवाना वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह व निमगव्हाण – चोपडा रस्त्यावर एक ट्रॅक्टर ट्रॉली सह अवैध वाळू वाहतूक करताना सापडले असता चारही ट्रॅक्टरवर कारवाई करत ग्रामीण पोलीस स्टेशन जवळील मैदानावर वाहने जप्त करण्यात आली आहेत .


अनिल गावित यांच्या कार्यकाळात व धाडसत्रात एकाच रात्री चार ट्रॅक्टर जमा केल्याची घटना व सर्वात मोठी कारवाई झाली असल्याचे बोलले जात आहे. चोपडा तालुक्यात आधी तापी नदीपात्रातून वाळू वाहतूक केली जात होती मात्र आता मिळेल त्या ठिकाणाहून नदी नाले इत्यादी ठिकाणापासून अवैध वाळू वाहतुकीचे पेव फोपावत आहेत. सरकारचा महसूल बुडवून होणाऱ्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कायमचा निर्बंध घालण्यात यावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे
रात्रीच्या वेळी महसूल विभागाचे अनेक कर्मचारी गस्त घालत असतात तरीही मात्र अवैध वाळू वाहतुकीला आळा बसत नाही हे मात्र विशेष..… रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करणारे व महसूल कर्मचारी यांच्यात चिरीमिरी च्या वाटाघाटी होत असल्याचे बोलले जात आहे .नवीन अध्यादेशानुसार सलग दुसऱ्या वेळेस विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडीच लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. तहसीलदार अनिल गावित यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी हातेड व गोरगावले तसेच तलाठी निमगव्हाण ,वेळोदे ,देवगाव, वडगाव बुद्रुक ,घाडवेल ,वढोदा, विटनेर ,मौजे हिंगोणे ,गणपुर ,तावसे बुद्रुक, सनपुले यासह पोलीस पथकाने कारवाई केली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More