महाराष्ट्र आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती संपूर्ण चोपडा तालुका सहभागी आय टक .. २१ जूनला आंदोलनाचा एल्गार

महाराष्ट्र आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती संपूर्ण चोपडा तालुका सहभागी आय टक.. २१ जूनला आंदोलनाचा एल्गार
चोपडा प्रतिनिधी :—-


महाराष्ट्र राज्यातील ६७ हजार आशा स्वयंसेविका व ३ हजार गटप्रवर्तक १५ जून पासून बेमुदत संपावर आहेत.
त्यांना अत्यंत कमी मानधन मिळते. त्यांना कोरोना संबंधित कामासाठी दररोज ८ तास काम करावे लागते. तसेच अत्यंत जोखमीचे व जबाबदारीचे काम करतात. महाराष्ट्र सरकार त्यांना वेठविगारा सारखे वागवित आहे. त्यांना योग्य किमान वेतन व कोरोना संबंधित कामासाठी योग्य भत्ता मिळाला पाहिजे ही त्यांची मागणी आहे‌.


या संदर्भात मा उपमुख्यमंत्री व मा सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांशी कृती समितीच्या नेत्यांची वेळोवेळी सविस्तर चर्चा झाली होती.

आशा व गटप्रवर्तक या आरोग्य खात्याचा कणा आहेत. त्या आघाडीवरच्या योध्या आहेत, त्यांच्याबद्दल सरकारला आदर आहे, असे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री सांगतात. परंतु महाराष्ट्र सरकारची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे, आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करणे, सरकारला अशक्य आहे, असे माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी शेवटच्या मिटींगमध्ये भूमिका घेतली होती. त्यामुळे आशा व गटप्रवर्तक यांनी संप बेमुदत बहिष्कार चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात कृती समितीतर्फे आंदोलन सुरू आहे त्याचाच भाग म्हणून त चोपडे तालुक्यातील ४७ आशा यांनी चोपडे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय सहायक आरोग्य अधिकारी व मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय चोपडे यांना निवेदने सादर करून आमच्या मागण्यांवर विचार करेपर्यंत आरोग्य खात्याच्या कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला व येत्या २१ जून रोजी टी एम ओ व चोपडा नगर परिषद वर सकाळी ११ वा धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यावेळी निवेदन सादर करतेवेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ अमृतराव महाजन यांचे नेतृत्वात तालुका, अध्यक्ष मीनाक्षी सोनवणे,सचिव ,वंदना पाटील , वंदना सोनार, शालिनी पाटील ,विद्या कोळी, सुरेखा कोळी ,शहर पदाधिकारी पल्लवी पाटील ,ज्योती सोनवणे, आरती कपुरे ,योगिता मिस्त्री, आदी ४७ आशा उपस्थित होत्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More