चोपडा नपा पाणीपुरवठा संदर्भात जळगाव अतिरिक्त पोलीस अधिक्षकांनी घेतली कठोरे ग्रामस्थांची भेट

चोपडा नपा पाणीपुरवठा संदर्भात जळगाव अतिरिक्त पोलीस अधिक्षकांनी घेतली कठोरे ग्रामस्थांची भेट
चोपडा प्रतिनिधी :—


चोपडा नगरपालिका पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी चोपडा तहसीलदार, नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने कठोरे गावात शुक्रवारी दि.४ जून रोजी मोठा पोलिस फौजफाटासह बंदोबस्त लावला होता, त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, कालपासून कठोरे गावात खुप भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


जिल्हाधिकारी अभिजित राऊत व पोलिस अधीक्षक प्रविण मुंडे यांच्या सुचनेवरून जळगाव जिल्हा अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचिन गोरे यांनी आज ५ जून कठोरे गावाला भेट देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांशी चर्चा केली.
अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचिन गोरे यांनी प्रत्यक्ष नदी पात्रावरील कामाच्या ठिकाणी जाऊन गावकऱ्यांच्या सगळ्या मागण्या व समस्या नीटपणे ऐकून व समजून घेतल्या आणि सर्व मागण्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत व पोलिस अधीक्षक प्रविण मुंडे यांच्यासमोर मांडणार आहेत आणि पुढची महत्वाची बैठक जिल्हाधिकारी अभिजित राऊत व पोलिस अधीक्षक प्रविण मुंडे यांच्यासोबत कठोरे गावात होणार अशी ग्वाही दिली.


सचिन गोरे यांनी तापी नदी पात्रात जाऊन सद्य परिस्थितीचा आढावा घेतला.
आजच्या बैठकीला सचिन गोरे, पोलिस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव , चोपडा ग्रामीणचे प्रभारी पी आय संदीप आराक आणि नगरपालिकेचे अभियंता तसेच
गावाकडून माहिती सांगण्यासाठी तरुण कार्यकर्ते दिपक पाटील, शेतकरी अशोक पाटील, अरुण धनगर, दिनेश पाटील, योगेश पाटील, गोपाल पाटील, नीलकंठ पाटील, सरपंच , पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More