स्व.शांताराम नेेेवे यांच्या स्मृत्यर्थ
नानाश्री प्रतिष्ठानतर्फे अन्नदानाचा उपक्रम

स्व.शांताराम नेेेवे यांच्या स्मृत्यर्थ
नानाश्री प्रतिष्ठानतर्फे अन्नदानाचा उपक्रम
चोपडा – येथील रा.स्व.संघाचे स्वयंसेवक तथा वृत्तपत्र वितरक स्व.शांताराम तानाजी तथा एस.टी.नेवे यांच्या आठव्या पुण्यतिथी निमित्ताने वेले ता.चोपडा येथील अमर संस्था संचलित अनाथाश्रम,वृध्दाश्रम आणि मानव सेवा तिर्थ येथे नानाश्री प्रतिष्ठान तर्फे मिष्टान्न भोजन अन्नदान करण्यात आले.

नानाश्री प्रतिष्ठान दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवीत असतो.यावेळी कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर केवळ अन्नदान करण्यात आले.अयावेळी स्व.शांताराम नेवे यांच्या प्रतिमेचे पूजन अनाथ आश्रमातील विद्यार्थीनी कु.दिप्ती व श्रध्दा संदीप वाणी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पत्रकार श्रीकांत नेवे,सेक्रेटरी रुपेश नेवे सर,उपाध्यक्षा सौ.रंजना नेवे,संचालिका सौ.शुभदा नेवे ( साकळी),सौ.संगीता पंसारी (जळगाव)सौ.सायली हकिम(ब-हाणपूर),माध्य.शिक्षक दामोदर नेवे,मुकेश पंसारी आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन शेषराव पाटील यांनी केले.त्यासाठी अमर संस्थेचे निलेश चौधरी व सहका-यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More