अकुलखेडा येथे डॉक्टरने केला महिलेचा विनयभंग ; डॉक्टर विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

अकुलखेडा येथे डॉक्टरने केला महिलेचा विनयभंग ; डॉक्टर विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

चोपडा ( प्रतिनिधी )—–
महिला रुग्णाची तपासणी करतांना डॉक्टरने पीडितेच्या अंगास हात लावून मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे गैर कृत्य करून विनयभंग केला.या बाबत पीडित महिलेच्या तक्रारीवरून संबधित डॉक्टर विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना अकुलखेडा (ता.चोपडा) येथे बुधवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमार घडली.या घटनेने एकच खडबळ उडाली आहे. काजीपूरा (ता.चोपडा) येथील रहिवासी ह.मु. सिलवासा येथील २६ वर्षीय महिला रुग्ण पती

सोबत डॉ.अनंत लक्ष्मण महाजन रा.अकुलखेडा (ता.चोपडा) यांचे मालकीच्या श्रध्दा क्लिनीक येथे उपचारासाठी गेलेली असतांना यावेळी डॉ. अनंत महाजन यांची पत्नी डॉ.पल्लवी महाजन यांचे कडून पीडितेची तपासणी करणे बंधनकारक होते.परंतू डॉ.पल्लवी महाजन यांचे कडून तपासणी न करता स्वतः डॉ.अनंत महाजन यांनी दारुचे नशेत पीडितेची तपासणी करतांना मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे फिर्यादी यांचे अंगास हात लावून गैर कृत्य करून विनयभंग केला.या घटने नंतर पीडितेने पतीला घडलेला प्रसंग कथन केला.

या बाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून डॉ. अनंत लक्ष्मण महाजन रा.अकुलखेडा यांच्या
शहर पोलीस स्टेशनला भादवि कलम ३०४ अ,
५१० प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली
पो.हे.कॉ.विद्या पांडुरंग इंगळे या करीत आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More