स्वच्छ भारत रैली ने दुमदुमले चोपड़ा शहर

स्वच्छ भारत रैली ने दुमदुमले चोपड़ा शहर

यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आर्किड इंटरनॅशनल स्कूल चोपडा येथे विद्यार्थ्यांसाठी महात्मा गांधी जयंती निमित्त भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आपले शहर स्वच्छ शहर यासाठी शाळेपासून ते पंचायत समिति चोपडा पर्यंत स्वच्छता रॅली चे आयोजन करण्यात आले होते.रॅलीचे उदघाटन चोपडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री.भरत कासोदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चोपडा गट शिक्षणाधिकारी डॉ.भावना भोसले मॅडम, यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.राहुल पाटिल,डॉ.तृप्ती पाटिल,शाळेच्या प्राचार्या मिस परमेश्वरी आदि उपस्थित होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेपासून ते पंचायत समिति पर्यंत रस्त्यावरील पडलेले प्लास्टिक पिशव्या व कचरा गोळा करत, प्लास्टिक बंदीच्या व स्वच्छते संदर्भात घोषणा देत स्वच्छतेचा महान संदेश दिला तसेच पंचायत समितीचा परिसर स्वच्छ करुण स्वच्छते संदर्भात जनतेमध्ये जनजागृती करण्याचे कार्य केले. ऑक्सफ़ोर्ड स्कूल नेही रैली मध्ये सहभाग नोंदवाला.
समारोप कार्यक्रमात श्री. भरत कासोदे ,डॉ.भावना भोसले यानीही विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
यावेळी यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करुण स्वच्छता आपल्या शरीरा सोबतच समाजासाठी ही किती महत्वाची आहे ते सांगितले व आपले शहर स्वच्छ शहरला जनआंदोलन करण्याचे आव्हान केले आणि त्याचसोबत ट्रस्ट मार्फत पंचायत समितिच्या विविध विभागांना मोफत कचरा कुंडयांचे विद्यार्थ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यानंतर रॅली पंचायत समिति ते कृषी उत्पन्न बाजार समिती मार्गे जोरदार घोषणा देत शाळे पर्यंत आणण्यात आल्यानंतर विद्यार्थ्याना सुखरूप घरी सोडण्यात आले.याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More