महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार

महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार
चोपडा प्रतिनिधी :—–
क्रांतीज्योती महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक ,सांस्कृतिक जयंती उत्सव समितीची चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्सव साजरा करणे बाबत चर्चा संपन्न झाली .


कोविड 19 चा प्रादुर्भाव पाहता आणि राज्यसरकार यांचे आदेशानुसार कायदा सुव्यवस्था सुरळीत राहवे व कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा ज्योतिबा फुले जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी असे सुचविण्यात आले आहे तरी सांस्कृतिक व सामाजिक समितीचे जेष्ठ सल्लागार गोपाळराव सोनवणे यांनी पोलीस प्रशासनास सहकार्यची भूमिका करण्यास विनंती केली तसेच महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निलेश भालेराव , बापजी ग्रुपचे अध्यक्ष मुकेश बागुल , सुमित बागुल , ऋषिकेश सुखदेव , सुजित बागुल आदी उपस्थित होते
सहा पोलिस निरीक्षक संदीप आराक आणि महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक जयंती उत्सव समिती चोपडा यांच्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली .राज्यसरकार आणि जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार आणि कोविड 19 चे सर्व नियम पाळून जयंती साजरी करण्यात येईल अशी चर्चा झाली तसेच मिरवणूक न काढता साजरी केली जाईल असे ठरले असून सकाळी 7 ते रात्री 8 पावेतो साजरी कारण्याचे ठरले .
सर्व तमाम जनतेने व भिमसैनिक यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर माल्यार्पण आणि बुद्ध वंदना करून त्या ठिकाणी जयंती साजरी केली जाईल यांची नोंद सर्वांनी घ्यावी व सकाळी ७ ते रात्री 8 वाजेपर्यंत जयंती उत्सव कोविड 19 नियम पळून साजरी केली जाईल असे आवाहन समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More