दोन दिवसात व्यापारी बाजार पेठ सुरू न झाल्यास व्यापारी महामंडळ तीव्र आंदोलन छेडणार…*

चोपडा (प्रतिनिधी ) — येत्या 2 दिवसात चोपडा तालुक्यातील सर्व दुकानी प्रशासनाने सुरू केल्या नाहीतर चोपडा तालुका व्यापारी महामंडळ तीव्र आंदोलन छेडणार. कारण दिनांक 20 मार्च पासून 30 मार्च पर्यंत मा.कलेक्टर साहेब व मा.प्रांतसाहेब यांचा आदेशाने 11 दिवस सर्व व्यापार बंद होते.पुन्हा राज्य सरकारने 5 एप्रिल ते 30 एप्रिल जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तो संपूर्णपणे आमच्या व्यापाऱ्यांवर

अन्यायकारक आहे.मागील वर्षभरापासून वारंवार दुकानी (व्यापार)बंद करुण आमच्या व्यापाऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. रोजनदारी काम करणाऱ्या कुटुंबाचा तसेच गरजू ग्राहक व छोटे,मोठे व्यापारी,हातगाडी वाले किरकोळ व्यापारी यांचे मोठे नुकसान होत आहे.पर्यायाने प्रत्येकाची आर्थिक घडी विस्कळीत होते. म्हणून या निवेदना द्वारे जाहीर आवाहन करण्यात येत असून येत्या 2 दिवसात शासनाने सर्व व्यापार व आस्थापना सुरू कराव्या अन्यथा आम्ही सर्व व्यापारी महामंडळ चोपडा तीव्र आंदोलन छेडणार याची नोंद घ्यावी.असे निवेदन चोपडा प्रांत अधिकारी श्री.सुमित शिंदे साहेब व मा.तहसीलदार अनिल गावित साहेब यांना देण्यात आले. यावेळी खालील व्यापारी पदाधिकारी व शेकडो व्यापारी बांधव उपस्थित होते.अमृतराज सचदेव (अध्यक्ष व्यापारी महामंडळ,चोपडा) अनिलभाऊ वानखेडे संजयभाऊ कानडे ,भवरलालजी जैन,चंदुमामा पालीवाल (वरिष्ठ मार्गदर्शक) तसेच महामंडळ उपाध्यक्ष संजय श्रावगी,सुनील बरडीया,श्याम सोनार,सरचिटणीस-राजेंद्र जैन,नरेंद्र तोतला, श्याम परदेशी,प्रवीण राखेचा,दीपक राखेचा,अशोक कासवणी, पप्पू स्वामी व असंख्य पदाधिकारी व शेकडो व्यापारी बांधव उपस्थित होते.

