चोपडा जनता कर्फ्युसाठी आमदारांनी बोलाविली तातडीची बैठक

चोपडा जनता कर्फ्युसाठी आमदारांनी बोलाविली तातडीची बैठक

चोपडा प्रतिनिधी : —–
मागील काही दिवसांपासून चोपडा तालुक्यात कोरोनाचा रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे त्या पार्श्वभूमीवर जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम , 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अनवये करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून चोपडा तालुका दि 13 मार्च व 14 मार्च म्हणजे शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यु लागू करण्याचे निर्देश दिले आहेत त्या पार्श्वभूमीवर चोपडा येथील नवीन प्रशासकीय इमारतीत चोपडा विधानसभेच्या आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली .


त्यावेळी तहसीलदार अनिल गावित , उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग , गट विकास अधिकारी बी एस कोसोदे , मुख्याधिकारी अविनाश गांगोडे , अवतारसिंग चव्हाण – पी आय शहर पोलिस स्टेशन , संदीप आराक – सहा पोलिस निरीक्षक ग्रामीण , डॉ मनोज पाटील – वैद्यकीय अधीक्षक , डॉ प्रदिप लासुरकर – तालुका आरोग्य अधिकारी , के पी पाटील – सहा निबंधक सह संस्था , डॉ चंद्रकांत बारेला – आरोग्य अधिकारी न पा , तालुका कृषी अधिकारी यांसह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते .
सदर बैठकीत बाजारपेठ , आठवडी बाजार , किराणा दुकाने , नॉन इसेन्सिल सर्व दुकाने , भाजीपाला , फळे विक्री केंद्रे , शैक्षणिक संस्था , खाजगी कार्यालये , हॉटेल , रेस्टॉरंट , सभा , मेळावे , धार्मिक स्थळे,लग्न इतर कार्यक्रम बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले . तसेच अत्यावश्यक सेवा म्हणून दूध विक्री केंद्र , वैद्यकीय उपचार व सेवा , मेडिकल स्टोअर्स , अंबुलन्स सेवा सुरू राहतील .
तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की , कोविड लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद असून लसीकरणामुळे बऱ्याच प्रमाणात प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते , तसेच चाचण्याची संख्या वाढत असल्याने तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर किट पुरविले असल्याचे सांगितले तसेच स्पॉट रजिस्ट्रेशन केले तरी कोरोनाची लस मिळणार असल्याचे सांगितले .
डॉ मनोज पाटील यांनी सदर कोरोनाची स्ट्रेंथ पूर्वीपेक्षा धोकादायक असल्याचे सांगितले , सध्या पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचा टक्का 80 ते 85 असल्याचे सांगितले , सध्या उपजिल्हा रुग्णालयात176 रुग्ण उपचार घेत असून इतर उर्वरित रुग्ण होमकारेटाईन असल्याचे सांगितले .
सौ लताताई सोनवणे ( आमदार ) यांनी सर्वच अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे सूचित केले व दोन दिवस जनता कर्फ्यु 100% यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत व रस्त्यावर उतरून विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना केल्या .

भाजपचे तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी बैठकीत महात्मा फुले आरोग्य योजनेत कोरोना बाधितांना उपचार मिळत नसल्याची खंत व्यक्त करत प्रशासनाने लवकरात लवकर कोरोना बधितांसाठी योजनेतून उपचार मिळून द्यावा


सदर बैठकीत नायब तहसिलदार राजेश पऊळ , एम व्ही पाटील – माजी उपसभापती प स , आबा देशमुख , राजेंद्र पाटील ( बिटवा ) , अमृतराव महाजन , प्रदिप पाटील , गजेंद्र जैस्वाल , महेंद्र धनगर यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More