बाल शौर्य पुरस्कार जाहीर झालेल्या प्रणीत नितीन पाटील याचा
आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी केला सत्कार
प्रतिनिधी(सचिन जैस्वाल)

प्रवीण पाटील चोपडा शिरपूर रोडवरील शिव कॉलनी भागात वास्तवास असून प्रणित उर्फ प्रिन्स नितीन पाटील या बालकाला राष्ट्रपती पुरस्कार जाहिर झाला आहे. प्रणित नितीन पाटील हा चोपडा शहरातील पंकज ग्लोबलचा विद्यार्थी असून या विद्यार्थ्याने त्याने ५ डिसेंबर २०१९ रोजी घडलेल्या घटनेत त्याने चोरट्यांशी कडवी झुंज देत आई व मोलकरणीला मदत केली होती. यासाठी, त्या बालकाला राष्ट्रपती बालशौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून हा पुरस्कार मार्च महिन्यात देण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी नितीन पाटीलच्या चोपडा शहरातील शिव कॉलनीत असलेल्या साई अपार्टमेंटमध्ये ५ डिसेंबर २०१९ रोजी भरदुपारी पावणे चार वाजता अज्ञात चोरट्यांनी नितीन घरी नसतांना अपार्टमधील तिसऱ्या मजल्यावर जाऊन लुटमार करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला होता. तसेच, चोरटयांनी मिरची स्प्रेच्या साहाय्याने प्रणितची आई वैशालीच्या तोंडावर स्प्रेचा फवारा करत लुटमारीच्या उद्देशाने घरात धुडगूस घातली होती. यावेळी, बारा वर्षांच्या प्रिन्सने त्या चोरट्याचा पाय घट्ट धरून ठेवत चोरट्याला इतरत्र कुठेही फिरकण्यास संधी दिली नाही. दरम्यान, घरात काम करणारी मोलकरीण लताबाईने तिसऱ्या मजल्यावरून खाली आरडा-ओरड केल्यानंतर स्थानिक रहिवासी जमा झाले होते. त्यामुळे, दोन्ही चोरटे खाली पळून जात असताना तेथे एकत्र जमलेल्या लोकांमुळे चोरट्यांना पकडण्यात यश मिळाले होते. प्रिन्सने तेव्हा केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते.

राज्यपाल कार्यालयातून नितीन पाटील यांना आपल्या मुलाला बालशौर्य पुरस्कार जाहीर झाल्याचे फोनवरून कळविण्यात आले आहे. नितीन पाटील हे एका शाळेचे चेअरमन असून आई चोपडा शहरातील दिया गॅस एजेंसीच्या संचालिका आहेत.
या उल्लेखनीय कार्यानिमित्त प्रणीत पाटील याचा आमदार आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी केला सत्कार यावेळी प्रणीतचे वडील-आई उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार श्री.छगन वाघ तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू पाटील, महिला तालुकाध्यक्ष सौ.मंगलाताई पाटील, नगरसेवक प्रकाशदादा राजपूत, किशोर चौधरी, सौ.मनीषाताई जैस्वाल, सौ.संध्याताई महाजन, सौ.मीनाताई शिरसाठ, महेंद्र धनगर, पंचायत समिती सदस्य एम.व्ही.नाना पाटील, विकास पाटील, सुकलाल कोळी, अॅड.एस.डी.सोनवणे, गोपाल चौधरी, जगदीश मराठे, नितीन पाटील, बबलू पालीवाल आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
