निस्वार्थ भावनेने केलेली समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा : माजी आमदार बापू सो ,कैलास पाटील
▪️ राज्य समाजरत्न पुरस्कार प्राप्त बापू सो , भास्करराव पाटील यांचा केला सत्कार▪️
चोपडा (प्रतिनिधी) : निस्वार्थ भावनेने केलेली समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा असते. निराधारांना, वंचितांना, उपेक्षितांना मदतीचा हात देऊन त्यांच्या जीवनात पुनश्च आनंदाचे रंग भरण्याचे काम करणे हे ईश्वराची पूजा करण्यासारखे आहे. असे प्रतिपादन माजी आमदार व चोपडा सूतगिरणीचे चेअरमन बापू सो ,कैलास पाटील यांनी केले.
विधवा व घटस्फोटीत यांचे पुनर्विवाह घडवून आणण्याच्या कार्यासाठी ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्कार प्राप्त भास्करराव नाना पाटील (जानवे,ह मु चोपडा) यांचा सत्कार घडवून आणताना माजी आमदार कैलास पाटील पुढे म्हणाले की
समाजात सध्या मुलामुलींच्या लग्नाची फार बिकट समस्या आहे. अपेक्षेप्रमाणे संबंध जूळत नाहीत , अपेक्षा पूर्ण होत नाहीत , त्या मुळे काही महिन्यातच संबंध तुटतात,तर काहींना दुर्दैवाने अचानक वैधव्य येते, अशा बिकट समस्याचा सारासार विचार करून भास्करराव नाना पाटील यांनी जीला परीषद ( सेवानिवृतीनंतर पूनरविवाह व फ्रेश वर वधूवर व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून बरेचसे विवाह घडवून आणलेत.त्यांचे हे काम निस्वार्थ व कोणतीही फि न, घेता मोफत सेवा आहे हे विशेष.

भास्करराव पाटील यांच्या कामाची दखल ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी घेतली व त्यांना राज्य आदर्श समाजरत्न पूरस्काराने सन्मानित केले , त्या निमित्ताने चोपडा तालुका माजी आमदार तथा चेअरमन सुतगीरणी चोपडा कैलास पाटील यांनी त्यांचा
सुतगीरणी कार्यालयात सत्कार केला.
त्या प्रसंगी माजी पर्यवेक्षक प्रभाकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुतगीरणी संचालक मंडळ व कर्मचारी तसेच तुकाराम पाटील (घूमावल), प्रल्हाद पाटील (लासूर) प्रकाश रजाळे, रावसाहेब पाटील, हिंमतराव शिंदे , दिपक चव्हाण, (घूमावल),भैया राजपूत (विरवाडे), मनोहर पाटील (गोरगावले) प्रल्हाद पाटील व्हा चेअरमन शेतकी संघ,आदी मान्यवर हजर होते.
