विश्वात अद्भुत राम मंदिर उभारणीसाठी सढळ हस्ते मदत करा – महामंडलेश्वर प.पू.योगीजी बापू

विश्वात अद्भुत राम मंदिर उभारणीसाठी सढळ हस्ते मदत करा – महामंडलेश्वर प.पू.योगीजी बापू
प्रतिनिधी (सचिन जैस्वाल)
चोपडा – प्रभु श्रीरामांच्या जन्मस्थळीवर निर्माण होणारे श्रीराम परीवाराचे विश्वात अद्भुत मंदिर उभारणीसाठी प्रत्येकाने तन मन धनाने भरीव मदत करणे गरजेचे आहे असे आवाहन चोपडा तालुक्याचे श्रद्धास्थान प.पू.महामंडलेश्वर संत श्री. योगीजी बापू यांनी येथे केले.ते चोपडा तालूका श्रीराम मंदीर निधी संकलन समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भेटी प्रसंगी ते बोलत होते.
प.पू.योगीजी बापू पुढे बोलतांना म्हणाले की,प्रत्येक जण प्रात:समयी प्रभू श्रीरामाचे स्मरण करुन आपला दिवस सुरु करतो.अनेक वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिर निर्माण कार्य सुरु होत आहे.रामाने आपल्या जीवनात अनेक सुखद क्षण दिले.आयुष्य जगण्याचा आनंद निर्माण केला आहे.आता आपल्याला प्रत्येकाला रामासाठी काही करण्याचा – देण्याचा योग आला आहे.जगातील प्रत्येक भाविकाला आयोध्येत येतांना विशाल राममंदिर पाहिल्यानंतर अलौकिक समाधान मिळावे.थेट रामलल्लाला आपले योगदान देता यावे त्यासाठी सर्वांनी अत्यंत सात्विक भावनेने मदत करण्याचे पुन्हा आवाहन प.पू.बापूंनी केले.

दरम्यान महामंडलेश्वर योगीजी बापू यांच्या हस्ते गोपाळ पाटील, नरेंद्र पाटील व नंदलाल पाटील यांनी श्रीराम मंदिराचे उभारणीसाठीचे योगदान धनादेशद्वारे प्रातिनिधीक स्वरुपात तालुका संघचालक डॅा.मनोज साळूंखे व तालुका कार्यवाह संदीप साळूंके यांना सुपूर्द केले.तसेच यावेळी अनेक उपस्थितीत भाविकांनी मोठ्या प्रमाणावर मंदिरासाठी निधी सढळ हाताने देवू केला.
यावेळी माजी जिल्हा संघचालक राजेश पाटील, तालुका सहकार्यवाह संदीप सुर्यवंशी व शहर कार्यवाह मनोज विसावे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More