कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचा जळगाव जिल्हा सचिव पदी पत्रकार परेश पालीवाल

लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-येथील वार्ताहर तसेच भारतीय पत्रकार महासंघाचे तालुका संपर्कप्रमुख परेश दिलीप पालीवाल यांची नुकतीच कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचा जळगाव जिल्हा सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली.सामाजिक कार्याची आवड तसेच पत्रकारिता क्षेत्राचा माध्यमातून जनसामान्यांसाठी असलेली तळमळ लक्षात घेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप ननावरे यांच्या आदेशानुसार संघटनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष ऋषी पाटील यांनी त्यांची नियुक्ती केली.जिल्ह्यातील कृषी पदवीधर आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न संघटनेमार्फत सोडवण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.त्यांचा या निवडीबद्दल तालुक्यातील सामाजिक,राजकीय,पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More