चोपडा तालुक्यात आदिवासी पेसा गावात वनपट्टेधारक शेतकऱ्यांना बळीराजा योजनेतून विहीर आणि वीज उपलब्ध करून द्या # जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ..

चोपडा तालुक्यात आदिवासी पेसा गावात वनपट्टेधारक शेतकऱ्यांना बळीराजा योजनेतून विहीर आणि वीज उपलब्ध करून द्या # जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ..


जळगाव,आदिवासी पेसा क्षेत्र बाहुल असून अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वन हक्कांचे मान्यता  अधिनियम 2006 नियम 2008 व सुधारणा 2012 अंतर्गत आदिवासीसाठी वनहक्क  कायदा असून ते आपलं उदरनिर्वाह वनहक्क कायदा अंतर्गत मिळालेल्या वनजमिनिवर असून  त्याठिकाणी ते जमीन कसत आहे.

परंतु आपली वन जमिनी चे बारमाही शेती इतर पिके घेण्यासाठी पाण्याची आणि विजेची तसेच शेतात जाण्यासाठी रस्त्यांची आवश्यकता असून अजून पर्यंत ते वंचित आहे.तसेच सद्या जळगांव जिल्हात आदिवासी महाराष्ट्र शासनाने १००दिवसात करावयाचा कामाचा आराखडा  विविध विभागांनी आदिवासी हितासाठी उपाय योजना राबविता असताना जिल्ह्यातील आदिवासी वनपट्टा शेतीकरी यांना क्षेत्र निहाय समूह, मसाला समूह व नगदी पीक घेण्यासाठी तसेच शेतजमीन कसण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे परंतु या सारखे नगदी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना पायाभूत सेवा  सुविधा पाण्याचीं (विहीर / बोरवेल) आणि लाईट (वयक्तिक DP) व्यवस्था या सारख्या सुविधा पुरविणे आवश्यक आहे.


त्याचप्रमाणे आदिवासी वनपट्टेधारक शेतकऱ्यांना प्रथम पाण्याची लाईटची व रस्त्यांची व्यवस्था करणे गरजेचे असून मा. महाश्याना विनंती करतो की आदिवासी विभागा मार्फत केंद्रीय सहायता योजने मध्ये किंवा बिरासमुंडा क्रांती योजने अंतर्गत विहिरी आणि विज वितरण विभाग अंतर्गत शेतकरी बळीराजा योजने मधून (विज) वयक्तिक विजेची वनपट्टेधारक  शेतकऱ्यांची  लाभ द्यावा. अशी मागणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना  निवेदना द्वारे  करण्यात आली आहे निवेवेदन देताना  प्रमोद बारेला उप सरपंच,कर्जाणे, पिंटू पावरा जिल्हा वन हक्क समिती सदस्य, नामा पावरा ,राकेश बारेला,कमेश बारेला यांच्यासह मेलाणे येथील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More