चोपडा नाकाबंदीच्या वेळेस 30 लाख रोकड जप्त…

चोपडा नाकाबंदीच्या वेळेस 30 लाख रोकड जप्त

चोपडा (प्रतिनिधी) – दि २४/१०/२०२४ रोजी मध्य रात्री तिरंगा चौक, श्रीनाथ प्राईड येथे होंडाई व्हेन्यू कंपनीची गाडी क्रमांक MP 09 -CK 7474 हिच्या मध्ये 30,00000 रुपये (500 रुपये दराचे 15, लाख रुपये, 200 रुपये दराचे 6 लाख रुपये, 100 रुपये दराचे 9, लाख रुपये) असे रोकड जप्त करण्यात आली


इसम नामे इम्रान अल्लाउददीन मन्सुरी वय ४४ रा. बलवाडी ता. वरला जि. बडवाणी मध्यप्रदेश अजय अरुण पाटील वय ३२ रा. जयहिंद कॉलनी चोपड़ा असे वरील रक्कम बलवाडी रोकड घेऊन जळगाव कडे जात असताना चोपडा मार्गे जात असतांना तिरंगा चौकात श्रीनाथ प्राईड होटेल समोर मिळून आले आहेत. याबाबत सविस्तर पंचनामा करण्यात आले आहे.


दिनांक २४/१०/२०२४ रोज रात्री सार्वत्रिक निवडणूक विधानसभा २०२४ च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, महेश्वर रेड्डी साो. यांनी नाकाबंदी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या प्रमाणे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, मधुकर साळवे, व त्यांचे सोबत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. सदर रोकड कुठून कुठे घेऊन जात होते आणि ही रोकड कोणाची ? हिचा खरा मालक कोण ? याबाबत शहरात जोरात चर्चा असून याची कसून चौकशी पोलीस करीत आहे. ही रक्कम उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात येईल असे निवडणूक अधिकारी पाटोळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव
श्रीमती कविता नेरकर (पवार) तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी, चोपडा आण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, स.पो.नि एकनाथ भिसे, पो.उ.नि. अनिल भुसारे, पो.उ.नि. जितेंद्र वालटे, पो.उ.नि श्री. विजय देवरे, पो.उ.नि श्री. योगेश्वर हिरे, स.पो.उ.नि जितेंद्र सोनवणे, पोहेकों संतोष पारधी, पोहेको शिपी, पोहेकों ज्ञानेश्वर जवागे, पोना संदिप भोई, पोको प्रकाश मथुरे, पोकों प्रमोद पवार, पोको विनोद पाटील, पोकों अमोल पवार, पोकों मदन पावरा, पोकों रजनिकांत भास्कर, पोकों अक्षय सुर्यवंशी, पोकों समा तडवी अशांनी सदरची कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More