बालकवी ठोंबरे विद्यालयात रंगल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा
धरणगाव प्रतिनिधी:- योगेश पाटील
तालुक्यातील बालकवी ठोंबरे विद्यालयात शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सविस्तर वृत्त असे बालकवी ठोंबरे विद्यालयात शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम हनुमानाच्या फोटोला मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली वाहण्यात येऊन दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विविध विद्यालयातील मल्लांची वयोगटानुसार जोड लावण्यात आली व बालकवी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.जीवन पाटील सर व मा.श्री.एस.एस.पाटील सर यांनी प्रथम कुस्तीची जोड लावत स्पर्धेचे उदघाटन केले . याप्रसंगी प्रत्येक शाळेतील क्रीडाशिक्षक आपल्या मल्लांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित करतांना दिसून आले. तसेच या सर्व कुस्त्या म्याट वर घेण्यात आल्या.


स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मा.सूर्यवंशी सर, के.वाय.चौधरी सर,डी. एन.पाटील सर,जयकारे सर,के.एस.पाटील सर,हेमंत माळी सर,ओस्तवाल सर,फिलप गावित सर,मुसताक अली सर,मोहम्मद सर,किशोर पहिलवान,हरी पहिलवान,संदीप कंखरे,ज्ञानेश्वर महाजन आदींनी परिश्रम घेतले तसेच स्पर्धेचे सूत्रसंचालन मा.श्री.आर.बी.महाले सर यांनी केले.


