शासनाचा १२ कोटी ६५ लाख कर चुकविणाऱ्या चोपडा शहरातील ठगास अटक #सेवाकर विभागाची कारवाई

शासनाचा १२ कोटी ६५ लाख कर चुकविणाऱ्या चोपडा शहरातील ठगास अटक #सेवाकर विभागाची कारवाई..

खोटी बिले देऊन शासनाचा कर चुकविणाऱ्या चोपडा शहरातील स्वामी ट्रेडिंग कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. त्याने शासनाचा १२ कोटी ६५ लाख रूपयांचा जीएसटी कर बुडविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विभागाने गुरूवारी दुपारी १२ वाजता त्याला अटक केल्याची, माहिती वस्तू व सेवाकर विभागाचे राज्यकर उपायुक्त सूर्यकांत कुमावत यांनी प्रसिध्दीत्रकान्वये दिली. नामदेव दौलत धनगर (रा. चोपडा) असे अटक केलेल्या कंपनीच्या मालकाचे नाव आहे.

चोपडा येथील स्वामी ट्रेडिंग कंपनी या प्रकरणामध्ये मालक नामदेव दौलत धनगर यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता तब्बल ६५ कोटीची खोटी बिले देऊन शासनाची १२ कोटी ६५ लाख रूपयांची कर चुकविल्याचे समोर आले आहे. धनगर यांनी कमिशन मिळवण्यासाठी जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणच्या ९० मक्तेदारांना सिमेंटचा पुरवठा केल्याची ६४.७१ कोटी रुपयांची बनावट बिले दिली. वस्तू व सेवाकर अधिनियमच्या तरतुदीचे उल्लंघन केले. धनगर यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग अन्वेषण शाखेने गुरूवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अटक केली आहे. ही कारवाई सहआयुक्त सुभाष भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यकांत कुमावत यांच्या नेतृत्वात माहुल इंदाणी, रामलाल पाटील, प्रशांत रौंदळ, संदीप पाटील, योगेश कानडे, स्वप्नील पाटील, दीपक पाटील, सिद्दार्थ मोरे, संध्या वाकडे, श्वेता बागुल, परमेश्वर इंगळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More