रावेर मतदार संघातून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला आनंद उत्सव …
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी
चोपडा तालुक्यात रावेर मतदार संघात रक्षा खडसे यांचे जाहीर होताच कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडूनआनंद उत्सव साजरा केला .

गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव आणि रावेरमधून नेमके कुणाला तिकिट मिळणार याबाबत मोठी उत्सुकता लागली होती. रावेर मतदार संघात रक्षा खडसे सोबत डॉ केतकी पाटील व अमोल जावळे यांचे नाव चर्चेत होते मात्र भाजपचे आज दुसरी यादी जाहीर केली असून २० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात जळगावातून स्मिता वाघ तर रावेरातून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रावेरमधून मात्र रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे. यात जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकिट कट झाले असून त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाली आहे.

रावेर लोकसभा कडे लक्ष लागून असलेल्या मतदार संघात आज उमेदवारी जाहीर झाल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे काय भूमिका बजावतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. याबाबत नागरिक तर्कवितर्क व चर्चा करीत आहे

