चोपडा येथील समता नगर भागात दगडफेक केल्याप्रकरणी २० जणांवर चोपडा शहर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल.# ७ आरोपींना अटक …

चोपडा येथील समता नगर भागात दगडफेक केल्याप्रकरणी २० जणांवर चोपडा शहर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल.# ७ आरोपींना अटक …

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा

दि. २/९/२०२३रोजी रात्री साडे बारा वाजेचा सुमारास, पंचशिलनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिराच्या बाजुला असलेल्या जागेला समोरुन पत्रे लावल्याच्या कारणावरुन व पत्रे का लावले असे विचारल्याच्या कारणावरुन रुपेश गोकुळ भालेराव रा. पंचशिलनगर, पंकज अशोक बावीस्कर, रोहीत दिलीप धिवरे, वसंत बाबुराव शिंदे, निलेश बापुजी भालेराव, परशुराम सुकदेव करंकाळ, अमोल कैलास सदांनशिव व ईतर अनोळखी ८ ते १०लोकांनी मिर्झा मुस्तुफा गुलाब बेग रा. समतानगर यास रस्त्यात आडवुन चापट, बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केल्यामुळे मिर्झा मुस्तुफा गुलाब बेग रा. समतानगर, शेख शोएब शेख युनुस रा. रामपुरा, अयाजोद्दीन चिराकोद्दीन जहागिरदार रा. समतानगर, नबी उद्दीन शहानोद्दीन मोमीन रा. समतानगर, शेख शाहीद शेख सादिक रा. समतानगर, शहादाब बेग गुलाब बेग, शेख युसुफ शेख गाझी मोमीन रा. शेतपुरा, शेख समीर शेख युनुस रा. रामपुरा अपार्टमेंट व इतर १० ते १२ अनोळखी इसम यांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन समतानगर व पंचशिल नगर मधील वरील आरोपींनी एकमेकांना चापट बुक्क्यांनी मारहाण करुन तसेच एकमेकांच्या दिशेने दगड विटा फेकुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिराच्या समोरील खिडकीच्या काचा फोडुन तसेच कंपाउंडवरील सुमारे ८-१०लाईट फोडुन अंदाजे १० ते १५ हजार रुपयांचे नुकसान केले.

म्हणुन  रुपेश गोकुळ भालेराव रा. पंचशिलगर, पंकज अशोक बावीस्कर रा. भिमनगर, रोहीत दिलीप धिवरे रा. पंचशिलनगर, वसंत बाबुराव शिंदे रा. पंचशिलनगर ,निलेश बापुजी भालेराव, रा. पंचशिलनगर, परशुराम सुकदेव करंकाळ रा. पंचशिलनगर, अमोल कैलास सदांनशिव रा. पंचशिलनगर ,मिर्झा मुस्तुफा गुलाब बेग रा. समतानगर, शेख शोएब शेख युनुस रा. रामपुरा, अयाजोद्दीन चिरागोद्दीन जहागिरदार रा. समतानगर,नवी उद्दीन शहानोद्दीन मोमीन रा. समतानगर, शेख शाहीद शेख सादिक रा. समतानगर,शहादाब बेग गुलाब बेग रा. समतानगर,शेख युसुफ शेख गाझी मोमीन रा. शेतपुरा,शेख समीर शेख युनूस, रा.रामपुरा अपरर्मेंट,व २०ते२२ अनोळखी इसमा विरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३२३, ३३६,५०४,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


*पोलिसांनी सात जणांना घेतले ताब्यात*
मिर्झा मुस्तुफा गुलाब बेग रा. समतानगर, शेख शोएब शेख युनुस रा. रामपुरा, अयाजोद्दीन चिराकोद्दीन जहागिरदार रा. समतानगर, परशुराम सुकदेव करंकाळ रा. पंचशीलनगर, निलेश बापुजी भालेराव, रा. पंचशीलनगर , वसंत बाबुराव शिंदे रा. पंचशिलनगर,रुपेश गोकुळ भालेराव रा. पंचशिलनगर यांना ताब्यात घेण्यात आले असुन अटकेची कारवाई करण्यात आली पुढील तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांचा मार्गदर्शनात संतोष पारधी करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More