तीन गावठी पिस्टल सह दोन आरोपी अटकेत चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाही.#एकूण सहा लाख ८७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त…

तीन गावठी पिस्टल सह दोन आरोपी अटकेत चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाही.#एकूण सहा लाख ८७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी..

चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळलेल्या गुप्त माहितीचा आधारे सापळा रचून  तालुक्यात सत्रासेन ते उमर्टी रोडवर मोरचिडा शिवारात गावापासून जवळपास नऊ किलोमीटर अंतरावर दोन आरोपी तीन गावठी पिस्तूल घेऊन जात असताना ग्रामीण पोलिसांनी त्यांना पकडून कारवाई केली आहे.  दोन्ही आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे.


दि.१ सप्टेंबर रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास आरोपी राजेंद्र दत्तात्रय मुसळे (वय २२) रा. उरुळी कांचन कोरेगाव रोड भुजनगर पुणे आणि अनिकेत सूर्यकांत पीठे (वय २४ वर्ष) राहणार उरळी कांचन तळवणी चौक पुणे हे दोन आरोपी व त्यांच्या ताब्यात असलेली मारुती सुझुकी कंपनीच्या स्विफ्ट कार क्र. एम एच १२ यु सी १३ ७४ या मध्ये एकूण चार आरोपी होते त्यातील दोन आरोपी पळून गेले दोन आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून फरार झालेल्या दोन्ही आरोपींचा शोध घेऊन लवकरच ताब्यात घेऊ अशी माहिती निरीक्षक के.के.पाटील यांनी महारष्ट्र9शी बोलताना दिली. कारमधून सीट खाली प्रतेकी२५ हजार रुपये किमतीचा पहिला कट्टा दुसरा कट्टा आरोपी राजेंद्र मुसळे यांचे डावे बाजूला कमरेस लावलेला मिळून आला आणि  तिसरा कट्टा हा आरोपी अनिकेत पीठे यांच्या डाव्या कमरेस लावलेला मिळून आला.चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. त्यामुळे या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


१०हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल ६ लाख रुपये किमतीची एक स्विफ्ट कार, २ हजार २०० रुपये रोख आरोपी राजेंद्र मुसळे यांच्या जवळ मिळून आले. असा एकूण ६लाख ८७ हजार २०० रुपयांचा ऐवज चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी असलेले व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील व चोपडा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन मधील पोहेका किरण वासुदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपी राजेंद्र मुसळे व अनिकेत सूर्यकांत पीठे यांच्या विरोधात कलम ३/२५, ७/२५प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More