यावलच्या आदिवासी प्रकल्प विभागातील लाचखोर लेखापालाला 20 हजाराची लाच घेताना एसीबीने पकडले

यावलच्या आदिवासी प्रकल्प विभागातील लेखापालाला 20 हजाराची लाच घेताना पकडले….

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क प्रतिनिधी..

लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात
यावल जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आणखी एक लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे.

20 हजारांची लाच घेताना यावलच्या आदिवासी प्रकल्प विभागातील लेखापाला जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली तक्रारदार यांची पत्नी जिल्ह्यातील एका तालुक्याच्या ठिकाणी आदिवासी वस्तीगृह चालवत असलेल्या बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून 2021-22 वर्षात भोजन पुरवठा करण्यात आला होता.


त्यापोटी 73 लाखांचे बिल मंजूर होवून मिळाले देखील मात्र काम करून देण्याच्या मोबदल्यात लेखापाला रवींद्र बी.जोशी याने मंजूर बिलाच्या अर्धा टक्के अर्थात 36 हजार 500 रुपयांची लाच मागितली.
तडजोड करून 20 हजार रुपये देण्याचे ठरलं. मात्र याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपीने आदिवासी कार्यालयातच लाच स्वीकारताच त्यास एसीबीकडे अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More