अकुलखेडा जवळ लासूर चोपडा एसटी बस पलटली… सुदैवाने जीवितहानी नाही…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-
चोपडा तालुक्यातील अकुलखेडा गावाजवळ आज सकाळी एसटी बस पलटी झाली आहे मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.
सविस्तर वृत्त असे की, सकाळी लासुर येथून पावणे सहा वाजता विद्यार्थ्यांची फेरी घेऊन एसटी चालक सागर पाटील चोपडाकडे येत असताना अचानक भरदार वेगाने पिकअप गाडी अंगावर येत असल्याने पिकअप गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या कडेला उतरवली असता , रस्त्याला साईड पट्टीच नसल्याने एसटी बस खड्ड्यात पडल्याने जागेवरच पलटी झाली आहे.



त्यात प्रवासी होते मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रावसाहेब रमेश सोनगिरे वय- ४८ (दिव्यांग) ,रमेश देवराम महाजन – वय ४७ , ओम रमेश महाजन – वय १५ , लहू महाजन सर्व राहणार लासूर हे किरकोळ जखमी झाल्याचे समजते…
चोपडा तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच आहे .रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने खड्डे वाचवण्याचा प्रयत्नात चालकांचा वाहनांवरील ताबा सुटल्याने अशा घटना घडत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये चर्चिली जात आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने जातीने लक्ष घालून तातडीने रस्त्यांवरील खड्डे बुजवून अपघातांची मालिका थांबवावी अशी मागणी होत आहे. आता पर्यंत लहान वाहनांचे अपघात नेहमीच एकवात होते पण आज एस टी बस पलटी झाल्याने सुज्ञ नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागा संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे….

