भाजप नेते घनश्याम अग्रवाल याच्या कडून २५ नाभिक समाजातील कुटूंबाना एक महिन्याच्या किराणा-वडगाव बु येथील १५ कुटूंबाना खाद्यतेलाची वाटप

प्रतिनिधी | चोपडा
भाजपचे माजी केंद्रीय समितीचे सदस्य व स्थानीक नेते घनश्याम अग्रवाल यांनी आज पुन्हा चोपडा शहरातील ज्या नाभिक समजावर खरोखर उपासमारिची वेळ आली आहे,ज्या कुटुंबातील लोक दररोज च्या कामावर अवलंबून आहेत मात्र कोरोना च्या पार्श्वभूमीवर संचार बंदित आपला रोजगार बुडाला आहे अश्या चोपडा शहरातील एकूण २५ कुटूंबाना एका महिन्याचे किराणा साहित्य भरून दिले आहे.
घनश्याम अग्रवाल व त्याच्या मित्र मंडळाकडून चोपडा शहरात दररोज सायंकाळी तीनशे लोकांना खिचडी वाटप,पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीत प्रत्येकी पन्नास हजराची मदत व आज चोपडा शहरातील २५ नाभिक समाजाच्या कुटूंबाना किराणा मदत व तालुक्यातील वडगाव बु गावातील १५ कुटूंबाना प्रत्येकी एक लिटर खाद्यतेल पुरवले आहे.
नाभीक समाजाच्या ज्या परिवाराना मदत केली त्या परिवाराना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही,या साहित्य वाटपकामी नाभिक समाजाचे समाज अध्यक्ष मनोहर सोनगिरे, उमाकांत निकम,सोपान बाविस्कर,बापु पवार,विनोद निकम,राजु निकम,राजू ऐशी,भारत सेंदाणे,राहुल निकम,बाळा निकम,यांचा सह समाज बांधव उपस्थित होते.या समाज बधवांनीच घनश्याम अग्रवाल याची मदत त्यांना घरपोहच दिली आहे.तसेच तहसीलदार अनिल गावीत यांनी सांगितल्यानुसार वडगाव बु गावी १५ कुटूंबाना तेल पूरविण्यात आले आहे.त्याचप्रमाणे दररोज खिचडी वाटपाचा देखील शेतपुरा येथील मित्र मंडळाचे पदाधिकारी नित्यनेमाने दररोज सायंकाळी खिचडी वाटप जवळपास तीनशे लोकांना करत आहेत.

