विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी राधाबाई लिलाचंद पाटील
शंभर टक्के महिला राज असलेल्या सोसायटीची निवडणूक बिनविरोध
चोपडा:-(प्रतिनिधी) सचिन जायसवाल

तालुक्यातील १००%महिला राज असलेल्या विटनेर येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन इंदिराताई पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यामुळे रिक्त झालेल्या जागी चेअरमन पदाची निवडणूक त्यांच्याच मार्गदर्शनाखाली व सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन सोमवारी दि ६रोजी सोसायटीच्या कार्यालयात पार पडली.निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक कार्यालयातील वरिष्ठ सहकार अधिकारी बी.एम.महाले होते. राधाबाई लिलाचंद पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी. एम. महाले यांनी जाहीर केले. यावेळी सोसायटीचे व्हा. चेअरमन सुपाबाई जानकीराम पाटील,सेक्रेटरी अशोक नथ्थू पाटील,इंदिराताई भानुदास पाटील,यमुनाबाई रामदास पाटील,शकुंतलाबाई माधवराव पाटील,राधाबाई देविदास पाटील,मंदाबाई लिलाचंद पाटील,मनीषा विजय पाटील,सुरेखा रामलाल धनगर हिरकणबाई राजधर मिस्तरी,कमलबाई छगन कोळी ह्या महिला सदस्या हजर होत्या. चेअरमन राधाबाई पाटील यांचा नेमीचंद पाटील,भानुदास पाटील,योगेश कोळी,मनोहर पाटील,दिलीप पाटील,गणेश पाटील,दिलीप चौधरी,देविदास रायसिंग,नरेंद्र पाटील,रमाकांत पाटील,सुरेश पाटील,राजधर मिस्तरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवडीनंतर बोलताना शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना मिळवून देणार असल्याचे नवनियुक्त चेअरमन राधाबाई लिलाचंद पाटील यांनी सांगितले.
