डॉ संजय चौधरी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
चोपडा – येथील भगिनी मंडळ संचलित प्रेरणा मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. संजय तुकाराम चौधरी यांना कास्ट्राईब संघटनेतर्फे नुकताच ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

दि. ७ ऑक्टोबर रोजी नागपूर येथील कास्ट्राईबच्या अधिवेशनात डॉ. संजय तुकाराम चौधरी यांना नागपूर येथील विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे (मुंबई), कवी डॉ. यशवंत मनोहर, मारपकवार व कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णाजी इंगळे उपस्थीत होते. तसेच अपंग विभाग संघटनेचे कार्याध्यक्ष तुषार भालेराव, सचिव सुहास कुरुकले, अरविंद सोनवणे, विशाल असोदे, महासंघाचे सरचिटणीस सुरेेश तांबे, कास्ट्राईब जिल्हा अपंग विभाग शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेचे जळगांव जिल्हा अध्यक्ष सुरेश महाले, व राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. संजय चौधरी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल भगिनी मंडळ संस्थेच्या अध्यक्षा पुनम आशिष गुजराथी, सचिव उर्मिलाबेन गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, प्राचार्य राजेंद्र महाजन, प्राचार्य डॉ ईश्वर सौंदाणकर, मुख्याध्यापक सुनील चौधरी, मुख्याध्यापक अरुण संदनशिव, प्रा. आशिष गुजराथी यांनी अभिनंदन केले. तसेच प्रेरणा मतिमंद मुलांच्या शाळेतील शिक्षक सौ सरला माळी, सौ नंदिनी याज्ञीक, सुरेश सपकाळे व उदय दीक्षित यांनी अभिनंदन केले
