भुसावळच्या नगरसेवक रवींद्र खरात यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार पाच जणांचा मृत्यू

भुसावळच्या नगरसेवक रवींद्र खरात यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार पाच जणांचा मृत्यू

भुसावळ (प्रतिनिधी )जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर गोळीबाराने हादरले अज्ञात हल्लेखोरंनी रवींद्र खरात यांचा कुटुंबावर हल्ला केला. हल्ल्यात त्यांचे बंधू भाऊ सुनील बाबूराव खरात (५५) व स्वत: रवींद्र बाबूराव खरात (५०), मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०) तसेच सुमित गजरे असे एकूण 5 जण ठार झाले आहेत. या हल्ल्यात इतर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. आज रात्री झालेल्या या धक्कादायक घटनेमुळे भुसावळ शहर हादरून गेले आहे.
भुसावळ भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला. आज रात्री झालेल्या या धक्कादायक घटनेमुळे भुसावळ शहर हादरून गेले आहे.
नगरसेवक रवींद्र खरात हे समता नगर येथे राहतात. आज रात्री पावणे दहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी खरात यांच्या घराच्या अंगणात येऊन अंधाधुंद गोळीबार केला. त्यामुळे खरात यांच्या कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली. या गोळीबारात खरात यांचे बंधू सुनील खरात आणि त्यांचा मुलगा सागर हे जागीच ठार झाले. तर स्वत: रवींद्र खरात आणि त्यांचा मुलगा रोहित खरात यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यात रवींद्र खरात यांची पत्नी पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा हितेश आणि असे चारजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More