शेतकऱ्यांशी फारकत घेतलेल्या “चोसाका” चे एकदा शुभमंगल होऊनच जाऊ द्या.. मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्ती

शेतकऱ्यांशी फारकत घेतलेल्या “चोसाका” चे एकदा शुभमंगल होऊनच जाऊ द्या.. मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्ती.


चोपडा(प्रतिनिधी) तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरलेला चहार्डी येथील चोपडा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना बऱ्याच वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. जिल्ह्याचे नेते व सहकार महर्षी स्वर्गीय धोंडुआप्पा पाटील यांनी निस्वार्थीभावनेने रू.३२ कोटीं एैवजी फक्त रू.२८ कोटींमध्ये या कारखान्याची उभारणी करून शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळवून दिली होती.

कालांतराने सर्वपक्षीय राजकारणाचा बळी ठरलेला चोसाका आज पूर्णतः बंद अवस्थेत आहे. तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कारखान्याकडे मागील पेमेंट, कर्मचाऱ्यांचा काही वर्षांपासूनचा पगार व त्यावरील पी.एफ्.च्या रक्कमा,बँकेचे कर्ज बाकी आहे.यासाठी शेतकरी, कर्मचारी व संचालक मंडळ यांच्यातही समन्वय होणे गरजेचे आहे.बहुतेक श्रेयवादामुळे सुध्दा चोसाका सुरू होत नसावा असे वाटते.

पुढिल काळात कारखाना भाडेतत्वावर चालविणेस द्यावा का? कुणाकडे गहाण ठेवावा का? विक्री करावा का? का स्थानिकांनी सुरू करावा? अशा द्विधा परिस्थितीत चोसाकाची वाटचाल सुरू आहे.यासाठी चोसाकाचे सर्वपक्षीय नेतेमंडळी,विद्यमान संचालक मंडळ,शेतकरी नेते,ऊस उत्पादक शेतकरी,कर्मचारी यांच्यात सामंजस्य करार झाला पाहिजे.यासाठी शेतकर्यांशी फारकत घेतलेल्या चोसाका चे एकदा शुभमंगल होऊनच जाऊ द्या,अशी स्पष्टोक्ती चोपडा क्रुषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.


यंत्रसामुग्रीचे संरक्षण,देखभाल व दुरूस्ती होत रहावी..
विद्यमान संचालक मंडळ व अधिकारी यांनी आजतागायत कारखाना चांगल्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.असे असतांना सद्यस्थितीत कारखान्यातील यंत्रसामुग्री व इतर साहित्य यांचे संरक्षण होऊन वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती होणे गरजेचे आहे. बाहेरील तिनशें पाचशें कि.मी.वरिल कारखाने चोपडा तालुक्यातील येतात, जास्तीचा भाव देऊन ऊस घेतात व आपले कारखाने चालवीतात.तर चोपडा तालुका ऊस लागवडीचे अागार असताना फक्त तीस ते पन्नास कि.मी.आतील ऊस आणुन पूर्ण हंगामी कारखाना का चालवित नाही? हा ही संशोधनाचा विषय झाला आहे. बँक,शेतकरी,कर्मचारी यांच्या रक्कमा देऊन हा कारखाना लवकर सुरू करण्याबाबत हालचाली झाल्या पाहिजेत.असेही मत गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More