चोपड्यात रेमडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार
रुग्णांचा जीव धोक्यात , नातेवाईकांची इंजेक्शनसाठी भटकंती

चोपड्यात रेमडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार
रुग्णांचा जीव धोक्यात , नातेवाईकांची इंजेक्शनसाठी भटकंती
चोपडा प्रतिनिधी :—–
तालुक्यात गेल्या आठवड्याभरात रेमडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असून ,कृत्रिम टंचाई निर्माण करून रुग्णांची आर्थिक लुबाडणूक सुरू आहे . इंजेक्शन अभावी कोविड संसर्ग झालेल्या गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे . रेमडीसीवर इंजेक्शनसाठी रुग्णांचे संबंधित नातेवाईक डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन शहरात गल्लोगल्ली फिरताना दिसत आहेत .एक हजार रुपये किमतीचे इंजेक्शन बाराशे ते तीन हजार रुपये पर्यंत काळ्याबाजारात सर्रास विक्री होताना दिसत आहे . इंजेक्शनचा कथित काळाबाजार रोखण्यासाठी तात्काळ प्रशासनामार्फत चौकशी होऊन संबंधित औषधे विक्रेत्यांवर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी कोविंड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे .


गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून शहरात व ग्रामीण भागात कोरोनाच्या दुसऱ्या नवीनच स्ट्रेंथची धोकेदायक लाट आली असून त्यामुळे मार्च महिन्यात 300 पेक्षा जास्त रुग्ण दररोज आढळून येत होते त्यामुळे फक्त मार्च महिन्यात जवळपास सात हजार कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते तर जवळपास साठ रुग्णांचा मृत्यू झाला होता .रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे .दररोज रुग्णांचा मृत्यू होत आहे ही वस्तुस्थिती असून त्याचे वास्तव व विदारक चित्र तालुक्यात निर्माण झाले असताना रेमडीसीवर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणे कितपत योग्य आहे .
दुसऱ्या लाटेतील नवीनच स्ट्रेंथच्या विषाणूमुळे चोपडा तालुक्‍यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत भरमसाठ वाढ झाल्याने शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचे कोविड हेल्थ सेंटर ,महाविद्यालयाचे कोविड केअर सेंटर व शहरातील सहा खाजगी कोविड सेंटर हाऊसफुल्ल झाले आहेत . शहरात कोणत्याच हॉस्पिटलला बेड उपलब्ध होत नाहीत एवढी गंभीर व विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यात शहरात रेमडीसीवर इंजेक्शनची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार सुरू आहे .इंजेक्शन अभावी कोविड संसर्ग झालेल्या गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे . रेमडीसीवर इंजेक्शनसाठी रुग्णांचे संबंधित नातेवाईक डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन शहरात गल्लोगल्ली फिरताना दिसत आहेत.

एक हजार रुपये किमतीचे इंजेक्शन 1200 रुपये ते 3000 रुपयांपर्यंत विक्री होताना दिसत आहे .त्यामुळे अडचणीत सापडलेल्या रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे . शहरात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना कोणत्याच औषधी दुकानावर रेमडीसीवर इंजेक्‍शन मिळत नाही .शेवटी नातेवाईकांचे वरिष्ठांना , पदाधिकाऱ्यांना फोन करून किंवा सर्वत्र प्रयत्न संपल्याने इंजेक्शन आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण होत आहे .कोविडचे गंभीर रुग्ण रामभरोसे असून त्यांचे बरे-वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल रुग्णांच्या कुटुंबीयांकडून उपस्थित होत आहे
रेमडीसीवर इंजेक्शनची काळ्याबाजारात होणार्‍या बेकायदेशीर विक्रीची प्रशासनाकडून तात्काळ चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी असे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील ,शहर अध्यक्ष,गजेंद्र जैस्वाल, यांच्यासह तालुक्यातील सुज्ञ नागरिकांकडून मागणी होत आहे .
************************************
दुपारी तहसीलदार अनिल गावित चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आले असता रुग्णांच्या नातेवाईकांनी रेमडीसीवर इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या , रुग्णांचे नातेवाईक यांनी तहसीलदार अनिल गावित यांना रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा रुग्णांचे बरेवाईट झाल्यास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे . यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना पैकी भाजप युवा मोर्चाचे प्रकाश पाटील अनिल गावित यांना आपल्या भावना व्यक्त केल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More