चोपडा नगराध्यक्षपदा साठी  शिवसेना शिंदेगट व काँग्रेस युतीच्या उमेदवार नम्रता सचिन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

चोपडा नगराध्यक्षपदा साठी  शिवसेना शिंदेगट व काँग्रेस युतीच्या उमेदवार नम्रता सचिन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

चोपडा येथील नगराध्यक्ष पदाच्या  शिवसेना शिंदेगटाच्या उमेदवार नम्रता सचिन पाटील यांनी चोपड्याचे माजी आमदार लताताई सोनवणे,सुरेश सीताराम पाटील, एड शिवराज पाटील यांचा उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरते वेळी यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळत आहे

चोपडा नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदा साठी शिवसेना शिंदे गटाने काँग्रेसआय सोबत युती करत चोपड्याचे उद्योजक रवींद्र पाटील यांची सुनबाई नम्रता सचिन पाटील यांना उमेदवारी दिली आहे
आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्या पूर्वी चोपडा शहरात वाजत गाजत रॅली काढण्यात आली मध्ये आ किशोर पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळाले आहे


चोपडा शहरात आमची ताकद जास्त असल्याने आमच्या विरोधात सगळ्या शक्ती एकत्र आल्या असल्या तरी आमचा विजय हा शंभर टक्के होणार असल्याची प्रतिक्रिया उमेदवार नम्रता पाटील यांनी दिली आहे.
त्यांच्या विरोधात माजी नगर अध्यक्ष मनिषाताई चौधरी यांच्या कन्या साधना नितीन चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून त्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युतीचे उमेदवार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More