एक गावठी बनावटी कट्टा व 03 जिवंत काडतुस, मोटर सायकल सह एकुण 1,36,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत..#चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाही

एक गावठी बनावटी कट्टा व 03 जिवंत काडतुस, मोटर सायकल सह एकुण 1,36,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत..#चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाही..

दि. 31/01/2025 रोजी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे, यांनी गुप्तबातमीव्दारा मार्फत बातमी मिळाली की, लासुर ते हातेड रस्त्याने एक काळ्या रंगाची प्लसर गाडी क्रमांक एम एच 12 आर आर 6660 ही येत असुन त्यावरील दोन इसम हे बेकायदेशीररित्या अवैध्य गावठी बनावटी कट्टा व जिवंत काडतुस वाहतुक करुन घेवुन जात आहे अशी बातमी मिळाल्याने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे, व पोलीस .

अंमलदार यांनी लासुर ते हातेड रोडवर पाटचारी जवळ सापळा लावुन दि. 31/01/2025 रोजी 06.44 वाजेचे सुमारास बजाज प्लसर गाडी क्रमांक एम एच 12 आर आर 6660 अशी येतांना दिसल्याने सदर मोटर सायकल चालकास हाताचा इशारा देवुन थांबविले असता त्यावरील चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव नौफील रब्बानी सैय्यद वय-22 वर्ष, रा. सैय्यद नगर हडपसर गल्ली नं 4(A), लिब्रा शाळेजवळ ता. जि. पुणे व त्यापाठीमागे बसलेल्या अजय अशोक वाघमारे वय-24 वर्ष, रा. सलगर ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद, ह. मु. नेवाळे वस्ती चिखली ता.हवेली जि.पुणे असे सांगितले त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली .

असता त्याचेकडे एक गावठी बनावटी कट्टा, 03 जिवंत काडतुस असे मिळुन आल्याने त्याना सदर गावठी बनावटी हत्यार व जिवंत काडतुस कब्जात बाळगण्याचा परवाना आहे काय बाबत विचारणा केली असता त्यांचेकडे परवाना नसल्याचे सांगितल्याने नौफील रब्बानी सैय्यद ,अजय अशोक वाघमारे यांचेकडुन एक गावठी बनावटी कट्टा, 03 जिवंत काडतुस, दोन मोबाईल फोन, 500/- रुपये रोख व बजाज प्लसर गाडी क्रमांक एम एच 12 आर आर 6660 असे एकुण 1,36,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे करत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More