सिने स्टाईल १७ ग्राम सोन्याची मंगल पोत घेऊन चोरटे पसार #चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
दिनांक १६ रोजी सायंकाळी ०६.४५ ते ०७.०० वा. चे सुमारास चोपडा शहरात गौतम नगर भागात मातोश्री बिल्डीग विशाल सलुन जवळ रोडवर २८ते ३० वयोगटातील २ युवकांनी त्याचा कडील विना क्रमांकाची पल्सर मो.सा.ने फिर्यादी हे पायी पायी रोडने जात असतांना त्यांचे समोरुन येवुन फिर्यादी सौ आशा प्रल्हाद बिऱ्हाडे यांनी गळ्यात परीधान केलेली ८०,०००/-रु.कि.ची १७ ग्रॅम वजनाची दोन सरी असलेली तिस दोन सोन्याच्या वाट्या असलेली मंगल पोत ही जबरदस्तीने तोडून जबरी चोरी करुन घेवुन गेले म्हणून चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांचा मार्गदर्शनात उप निरीक्षक जितेंद्र वल्टे करत आहे



