मुस्तफा एज्युकेशन सोसायटी चोपडा ह्या शैक्षणिक संस्थेत संचालकांची मनमानी कारभार गैरप्रकार व घोटाळ्याची हॅट्रिक# संस्तेथ चे अध्यक्ष व संचालक यांच्यावर एका वर्षात तिसऱ्यांदा गुन्हा दाखल # शिक्षण विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष…

मुस्तफा एज्युकेशन सोसायटी चोपडा ह्या शैक्षणिक संस्थेत संचालकांची मनमानी कारभार गैरप्रकार व घोटाळ्याची हॅट्रिक# संस्तेथ चे अध्यक्ष व संचालक यांच्यावर एका वर्षात तिसऱ्यांदा गुन्हा दाखल # शिक्षण विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष…

चोपडा येथील मुस्तफा एज्युकेशन सोसायटी चे स्वयंघोषित अध्यक्ष व संचालकांनी अवैध रित्या दहा शिक्षकांची नियुक्ती केल्या प्रकरणी अध्यक्ष असगर अली महबूब अली, स्वघोषित उपाध्यक्ष लियाकत अली सय्यद नूर, अनाधिकृत सचिव आरिफ अहमद अब्दुल सतार, अनाधिकृत चेअरमन फिरोज खान महबूब खान,सेवानिवृत मुख्याध्यापक अंजुम अहमद कमरो‌द्दीन व बेकायदेशीर भरती झालेले शिक्षक नाहीद कौसार मलिक बशीर नाझिया बी इमरान अली,मजहर खान शकील खान,नदीम खान अहसान खान,सईद अब्दुल रशीद,शोएब खान सुलतान खान,मोहम्मद परवेज मोहम्मद हरून,पिंजारी शकील शेख आयुब,मसरत अली हजरत अली,मोहसीन शेख हाशम यांच्यावर चोपडा शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय सहिता कलम 420 ,201, 464,467,471,474,477,34 प्रमाणे गुन्हादाखल करण्यात आला आहे . पुढील तपास चोपडा पोलिस उपनिरीक्षक एकनाथ भिसे करत आहे

यापूर्वीही 17 जुलै 2023 रोजी बोगस शिक्षक भरती प्रकरणी या दोन्ही संचालकावर चोपडा पोलीस स्टेशन येथे 156 (3) या कलमानुसार गुन्हा नोंद झालेला आहे

या व्यतिरिक्त 24 जानेवारी 2024 रोजी देखील याच दोन्ही संचालक विरोध खोटे सह्या करून शासनाची व संस्थाचे फसवणुकीचा गुन्हा देखील चोपड़ा शहर पोलीस स्टेशन येथे कलम 156 (3) प्रमाणे नोंद झालेला आहे

या प्रकरण नंतर शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे दोन्ही संचालक विरुद्ध तीन वेळा चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे 156 (3) कलम प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस याबद्दल कारवाईत दिरंगाई करत आहे म्हणून पोलिसांबद्दल देखील संचय निर्माण झालेला आहे संस्थेचे काही संचालकांनी मे हायकोर्ट औरंगाबाद येथे देखीब चुकीची माहिती देऊन काही शिक्षकांची वैयक्तिक मान्यता मिळून  घेतलेली आहे  या प्रकरणात माध्यमिक शिक्षणाधिकारी वर देखील संशय निर्माण झालेला आहे कारण काही दिवसांपूर्वी ती निलंबित झालेले होते या संपूर्ण प्रकरणात मुस्तफा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष चिरागोदिन इंजाबुद्‌दीन शेख यांनी सर्व गोष्ट्यांवर लक्ष दिला आणि सर्व बेकायदेशीर कृत्या कोर्ट आणि पोलिसांच्या समोर आणले

शिक्षक भरती वेळी मुलाखातीस गैरहजर उमेदवाराच्या जागी त्यांना हजर दाखवण्यासाठी बऱ्याच उमेदवारांच्या खोट्या व बोगसह्या करून रेकॉर्ड तयार केल्याचे दस्त  प्रथमदर्शी पुरावेही  मे.कोर्टात सादर करण्याची फिर्यादी तयार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More