चोपडा तालुक्यातील भ्रष्टाचार विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सत्यमेव जयते आंदोलन

चोपडा तालुक्यातील भ्रष्टाचार विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सत्यमेव जयते आंदोलन

चोपडा तालुक्यातील पुरवठा विभाग व पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि ग्राम सेवक आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख इ. सर्व शासकिय कार्यालयीन अधिकऱ्यांचा भ्रष्ट कारभाराबाबत सिटीझन चार्टर (नागरीकांची सनद) मिळावी म्हणून येणाऱ्या २५ सप्टेंबर २०२४ रोजी शिवाजी महाराज चौकात सत्यमेव जयते आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष विजय दत्तात्रय पाटील (बाळासाहेब) यांनी दिली 

ग्रामीण पुरवठा जि.प. :- चोपडा तालुक्यात ग्रामिण पाणी पुरवठा साठी ८४ योजना मंजुर आहेत. त्या अंतर्गत ७४ योजना हे एकाच ठेकेदाराने घेतले आहे ते ते पण ५% जास्त दराने संबंधित  ठेकेदार MSP पाचोऱ्याचा असुन येवढे कामे एकाच ठेकेदाराला कसे देण्यात आले व ठेकेदाराने घेतल्या कामाची चौकशी व्हावी.

गटविकास अधिकारी आर. ओ.वाघ यांच्याशी चर्चा करताना  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी


या संपूर्ण प्रकारच्या चौकशी साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्यमेव जयते हे आंदोलन करणार आहे .चौकशी न झाल्यास भ्रष्टाचारा विरोधात आंदोलन तीव्र करू असे निवेदन तहसीलदार भाऊसाहेब थोरात ,व गटविकास अधिकारी रमेश वाघ यांना देण्यात आले आहे ह्या वेळी विजय दत्तात्रय पाटील (बाळासाहेब) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष, गिरीष सदाशिव देशमुख (शहर अध्यक्ष) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पेरश प्रतापराव देशमुख , मिलींद सोनवणे सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष स्वातीताई मिलींद बडगुजर महिला शहर अध्यक्ष  मायाबाई रविंद महाजन महिला शहर उपाध्यक्ष ,शुभम सोनवणे शहर अध्यक्ष युवक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More