संपूर्ण देशात वनौषधी कल्पतरू मोह वृक्ष बंधन मुक्त व्हावा-केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे शेतकऱ्यांची मागणी…
चोपडा (बातमीदार) ता.चोपडा जळगाव जिल्ह्यात लखपती दीदी कार्यक्रम निमित्ताने जिल्ह्याच्या दौऱ्यावर आमंत्रित प्रमुख पाहुणे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या दौऱ्याचे औचित्य साधून केंद्रीय कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद व्हावा या संदर्भात राहुरी विद्यापीठात अंतर्गत केव्हीके पालव जळगाव यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रयोगशील प्रगतशील व कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी व नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना शनिवार दि.24/8/24 रोजी ममुराबाद कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात आमंत्रित करण्यात आले होते.


शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी सुसंवाद साधला कृषी मंत्र्यांनी संवादातून शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नाची चर्चा करून त्या संदर्भीय लेखी निवेदनांचा स्वीकार कृषिमंत्र्यांनी केला व आपल्या मागण्यांच्या केंद्रस्थानी जरूर निरसन केले जाईल असे आश्वासन दिले या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी वनौषधीयुक्त भौगोलिक मक्तेदारी असलेला कल्पतरू मोहवृक्षास फलोत्पादन म्हणून राज मान्यता मिळवी तसेच महाराष्ट्र राज्य वन विभाग स्थापित विकास खारगे समितीप्रमाणे केंद्रस्थानी शेतकऱ्यांची मोहवृक्ष संगोपन संवर्धन व मूल्यवर्धनार्थ समिती स्थापन करावी अशा मागणी संदर्भाचे निवेदन म.राज्य मोहवृक्ष संवर्धन मंडळाच्या शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना देऊन हा वृक्ष प्राचीनकाली आयुर्वेदातील महत्त्व संदर्भात चर्चा होऊन मोहसंवर्धनात व मूल्यवर्धन संदर्भात या वृक्षाच्या उपयुक्ततेनुसार या झाडाचा फलोत्पादनात समावेश होऊन आयुष मंडळाचे लाभ मिळावेत. प्रक्रिया उद्योगासाठी उत्पादन पणन विपणनासाठी परवानामुक्त करावा.


उपघटक विकासासाठी ग्रामीण रोजगार कार्यक्रमाची नियोजन व्हावे.झाडांचे तांत्रिक संशोधन होऊन जागतिक स्तरावर व देशांतर्गत आयात निर्यात धोरण इतर फळाप्रमाणे शिथिल करावे. देशातील सर्व राज्यांच्या मोहवृक्षांच्या उपघटकांसाठीचे नियमात राज्यांचा समन्वय असावा. विशेष वृक्ष विकास योजना कृषी विभागाकडून अंमलबजावणी व्हावी. हा दीर्घायुषी वृक्ष 80 ते 100 वर्ष टिकणारा असल्याने याला फळबागांप्रमाणे विमा संरक्षण देऊन कार्बन क्रेडिटचा लाभ मिळावा. या वृक्षाच्या सर्वांगीण विकासासाठी केन्द्र स्तरावर समिती गठित करून जागतिक भौगोलिक ठेवा भविष्यकालीन पिढ्यांसाठी जतन व्हावा. या मागण्यांचे निवेदन मा.केंद्रीय कृषिमंत्री यांनी स्वीकारून देशातील मोहवृक्ष पहिला पथदर्शक प्रकल्प शेतकरी बी जी महाजन यांनी केलेल्या शेतीतील फलोत्पादन पद्धतीने प्रयोगाचे त्यांनी कौतुक केले.

देशातील पहिला नाविन्यपूर्ण (इनोव्हेटिव्ह) मोहवृक्ष पथदर्शक प्रकल्प 2007 पासून 12 एकर क्षेत्रात 900 मोह रोपांच्या लागवडीतून पाच प्रजाती संवर्धित केलेले शेतकरी श्री बीजी महाजन चुंचाळे ता.चोपडा जि जळगाव यांनी केलेले मोहवृक्षाचे विकासात्मक संशोधन संवर्धन व मूल्यवर्धनार्थ प्रायोगिक तत्त्वावरील मोहवृक्षा पासूनच्या उपघटकांपासून विविध प्रक्रिया उद्योग माध्यमातून टोळंबीचे वनस्पतीतूप.कल्प.
सिरप. फुलांचे लाडू. टसल रेशीम. फुलांचा अर्क. मध. मोहाच्या रोपांवर कलमीकरण पद्धतीने विकसित केलेले वेगवेगळे वर्गीकरणानुसार पाच प्रजातींचे संवर्धन केलेले रोपे त्यांनी प्रदर्शित केलेल्या स्टॉलला मा.कृषिमंत्री यांनी भेट देऊन त्यांनी संशोधनात्मक संग्रहित केलेले माहिती संकलित पुस्तक “मोहवृक्ष एक कल्पतरू” पुस्तकाचे अनावरण मा.शिवराज सिंह चव्हाण यांच्या हस्ते होऊन त्यांना मोह वृक्ष फळे व फुलांपासून प्रक्रिया केलेल्या वस्तूंचा नमुनासंच व “मोहवृक्ष एक कल्पतरू” हे पुस्तक भेट देण्यात आले.
याप्रसंगी भूमिपुत्र समूहाचे संचालक गुरज्या बारेला.वैद्य रवींद्रनाथ पाटील. भिकन बनसोडे चोपडा विठ्ठलचेआप्फ्रो सदस्य डॉ.रवींद्र निकम. अंबादास पाटील.कृषि विद्यापीठ तज्ञसल्लागार संचालक सदस्य पोलीस पाटील नरेंद्र पाटील महाराष्ट्र राज्य कृषी सन्मानार्थि संघटनेचे अध्यक्षअँड.प्रकाश पाटील जिल्ह्यातील शेतकरी बांधव दिवसभर जोराचा पाऊस असून सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्र जळगाव व पाल येथील सर्व पदाधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वरिष्ठ शास्त्रज्ञ जाधव यांनी केले उपस्थितांचे आभार तुषार गोरे यांनी मानले.

