चोपडा शहरातील मुख्य रस्ते दुरुस्त करावेत यासह इतर अनेक समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मुख्याधिकारी यांना निवेदन, कामे न झाल्यास निवेदनातून मोर्चाचा दिला इशारा

चोपडा शहरातील मुख्य रस्ते दुरुस्त करावेत यासह इतर अनेक समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मुख्याधिकारी यांना निवेदन, कामे न झाल्यास निवेदनातून मोर्चाचा दिला इशारा


महाराष्ट्र9 न्यूज नेटवर्क चोपडा


चोपडा शहरातील प्रमुख रस्ते त्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर गोल मंदिर पर्यंत मेन रोड, ग्रामीण पोलीस स्टेशन ते चिंच चौक, राणी लक्ष्मीबाई चौक ते थाळनेर दरवाजा, आझाद चौक ते बोहरा गल्ली यासह अनेक वसाहतींमध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. अक्षरशा या रस्त्यांची चाळण झालेली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती रस्त्यांची झालेली आहे.

म्हणून हे रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत. दिवसातून या रस्त्यांचा तीन ते चार वेळा कामानिमित्त वापर करावा लागतो, त्यामुळे मणक्यांमध्ये गॅप निर्माण होऊन पाठीचे दुखणे, मानेचे दुखणे, कंबर दुखणे, खांदे दुखणे यासारखे आजार जडलेले आहेत. म्हणून चांगले रस्ते देणे हे नगरपालिकेचे कर्तव्य आहे. डांबरिकरणातून ही हे रस्ते दुरुस्त करता येतील, अशा आशयाचे निवेदन चोपडा तालुका आणि शहर काँग्रेस तर्फे माजी जिल्हाध्यक्ष ऍड.संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिविक्षनाधिन मुख्याधिकारी अर्पित चौहान यांना दिनांक 12 रोजी सकाळी साडे अकरा वाजता नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दालनात देण्यात आले.


यासह चोपडा शहरात भटके कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या भटक्या कुत्र्यांना त्वचेचे आजारही झालेले आहेत. म्हणून या कुत्र्यांच्या त्वचेवरील जिवाणू किंवा विषाणू हे मानवाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर मानवासही त्वचेचे आजार किंवा इतर आजार उद्भवण्याची शक्यता आहे, म्हणून या भटक्या कुत्र्यांची विल्हेवाट लावण्यात यावी. तसेच शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे. चौका चौकात आणि गल्लोगल्लीत मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यवर्ती भागात बसलेले दिसून येतात. तसेच हे मोकाट जनावरे जिथे बसलेले असतात त्याच परिसरात मल(शेण) टाकतात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. म्हणून मोकाट जनावरांचा ही बंदोबस्त करण्यात यावा. मोकाट जनावरांच्या मालकांना याबाबत तुमची जनावरे दावणीला बांधण्यात यावी अशा सूचना देऊन मोकाट जनावरांची शहरातील संख्या कमी करावी अशा आशयाचे निवेदन काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष ॲड. संदीप पाटील, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, तालुका अध्यक्ष संजीव सोनवणे, माजी तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील,माजी उपनगराध्यक्ष सुप्रिया सनेर, रमेश एकनाथ शिंदे,मधुकर विठ्ठल पाटील, डॉ.अशोकराव कदम, मंगेश भोईटे,देविदास सोनवणे, किशोर पाटील, अकबर पिंजारी, सोहम सोनवणे, गौतम छाजेड, मोहन देवराम पाटील, प्रतापराव सोनवणे, धनंजय पाटील, विलास दारुंटे, देविदास पारधी, बाळकृष्ण पाटील, राजेंद्र पाटील, अशोक साळुंखे, हाजी महमूद तेली, लक्ष्मण काविरे,दत्तात्रय साळुंखे, सतीश पाटील यांचे सह शेकडो काँग्रेसचे चे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. निवेदन देताना परिविक्षनाधिन मुख्याधिकारी अर्पित चौहान ऍड. संदीप पाटील यांच्याशी बोलताना म्हटले की, आचारसंहितेचा अडथळा होत नसेल तर सर्व कामे तात्काळ मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More