ई पीक पाहणी ॲपच्या संदर्भात तांत्रिक अडचण सोडवण्याबाबत आज जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले...

ई पीक पाहणी ॲपच्या संदर्भात तांत्रिक अडचण सोडवण्याबाबत आज जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र9 न्यूज नेटवर्क

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र शासनाच्या ई-पीक पाहणी ॲप संदर्भात शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी जिल्हाध्यक्ष अमोल भाऊ जावळे यांना सांगितल्यानंतर त्यांनी लागलीच त्यांच्या पत्रावर सदर निवेदन अगदी काही तासात तयार करून पाठवले व नंतर जिल्हाधिकारी साहेबांची वेळ घेऊन त्या ठिकाणी किसान मोर्चाचे शिष्टमंडळ यांनी जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन सदर निवेदन देत शेतकऱ्यांना येत असणाऱ्या ई-पिक पाहणी ॲप संदर्भात त्वरित सुधारणा कराव्यात अशी नम्र विनंती केली.


यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करताना किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे,उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुरेश भाऊ धनके,जिल्हा उपाध्यक्ष नितीन राणे,सुरेश पाटील,यावल ता.अध्यक्ष सागर महाजन,रावेर ता.अध्यक्ष राहुल महाजन,सदस्य मनोज जावळे,चाळीसगाव ता.अध्यक्ष विजय पाटील,युवा मोर्चा जि.सो.मि सह-संयोजक हेमंत देवरे,कामगार मोर्चा जि.उपाध्यक्ष विजय बाविस्कर,सो.मि.जि.अध्यक्ष कामगार मोर्चा मिलिंद वाणी. या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More