महसूल दिनी तालुका स्तरावरील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण..# कोतवाल जितेंद्र धनगर यांना जिल्हा व तालुका स्तरीय पुरस्काराने सन्मानित…
चोपडा : तालुक्यात महसूल सप्ताहाला प्रारंभ झाला असून, दि. १ ते ८ ऑगस्ट यादरम्यान तहसील कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये पहिल्याच दिवशी उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दि. १ ऑगस्ट रोजी येथील तहसील कार्यालयात तालुका स्तरावरील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण करण्यात आले. महसूल विभागाती अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विवि क्षेत्रातील गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले .

पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांमध् सचिन बांबळे, रवींद्र माळी व रवी महाजन, अव्वल कारकून अरुण वसावे पंकज शिंपी, तलाठी इक्बाल तडवी अमीन तडवी, महसूल सहायक महेश पानगंटीवार, कपिल चौधरी, वाह चालक उमेश तळेकर, शिपाई भरत चौधरी, कोतवाल जितेंद्र धनगर विकास पाटील यांचा समावे आहे.

आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव व पोलिस अधीक्षक एम राजकुमार जळगाव,यांचे हस्ते सन 2022-2023 सालातील जिल्हास्तरीय उत्कृष्ट कोतवाल व मा उपविभागीय अधिकारी एकनाथ बंगाळे चोपडा ,भाऊसाहेब थोरात तहसीलदार चोपडा यांचे हस्ते सन 2022-2023 वर्षातील अरुण वसावे (अव्वल कारकून)व जितेंद्र धनगर (कोतवाल) याना जिल्हा व तालुका स्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

