सार्वजनिक जागेत तलवारीने केक कापणे आले युवकांचा अंगाशी चोपडा शहर पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल…

सार्वजनिक जागेत तलवारीने केक कापणे आले युवकांचा अंगाशी चोपडा शहर पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल…

चोपडा दि.22रोजी रात्री साडे नऊ वाजेचा सुमारास  शहरातील मास्टर कॉलनी भागात सार्वजनिक जागेत यातील आरोपी सैय्यद फैजलअली मझहरअली रा. शेतपुरा चोपडा, शाकीर सैय्यद साबीरअली रा. रॉयल एजन्सी समोर मास्टर कॉलनी चोपडा, दानिश सैय्यद साबीरअली रा. मास्टर कॉलनी चोपड़ा,  रिजवान अली अयाजअली रा. नुरानी मस्जिद समोर शेतपुरा चोपडा, दानिश शेख हमीद शेख रा. मास्टर कॉलनी चोपडा, बाबु लोहार निजाम लोहार रा. के.जी. एन. कॉलनी चोपडा,  साजीद शेख गफ्फार रा. चुनारअली, जबरे राम मंदीर जवळ चोपडा, शोएब शाह जाकीर शाह रा. फकीरवाडा चोपड़ा यांनी विना परवाना धारदार लोखंडी तलवार तसेच चाकु जवळ बाळगुन सार्वजनिक ठिकाणी रोडवर वाढदिवसाचा केक कापण्यासाठी वापर करतांना मिळुन आले.

२ हजार रुपये किमतीची एका बाजुला धारदार, टोकदार लोखंडी पाते असलेली तलवार तिचे पाते २८ इंच लांब व १.५ इंच रुंद व त्यास पितळी धातुची ६ इंचाची मुठ मुठचा आतील भाग काळ्या रंगाचा त्यावर सोनरी रंगाचा दोरा गुंडांळलेली  आरोपी नामे शोएब शाह जाकीर शाह रा. फकीरवाडा चोपडा याचे घरात मिळुन आलेली तसेच मा. जिल्हाधिकारी सो. जळगांव यांचेकडील मनाई आदेशाचे उल्लघंन केले म्हणुन चोपडा शहर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4/25सह मु.पो. का. कलम 37 (1) (3) चे उल्लघंन 135, भादवि कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आठ पैकी सात आरोपींना अटक करण्यात आले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांचा मार्गदर्शनात  पोना.संदीप छगन भोई करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More