चोपडा तालुक्यातील सी सी आय कापूस केंद्र व तूर हरभरा खरेदी केंद्र सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन होणार ,शेतकरी कृती समिती तर्फे निवेदन

चोपडा तालुक्यातील सी सी आय कापूस केंद्र व तूर हरभरा खरेदी केंद्र सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन होणार ,शेतकरी कृती समिती तर्फे निवेदन


…चोपडा तालुक्यात सी सी आय मार्फत शासनाने कापूस खरेदी केंद्र केलं सुरू केलं पण ते नावाला थोडेफार दिवस चालल पण नंतर बंद केले त्यावर विचारणा केल्यास कुणाला गोडाऊन नाही म्हणून सांगितल जात तर कुणाला ग्रेडर नाही असे सांगितल्याचे कळते व तूर खरेदीची नोंदणी केली पण खरेदी सुरू नाही ते सुरू होणे साठी शेतकरी कृती समितीने आज निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला.यानंतर तहसीलदार अनिल गावित यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता होळीचे मजूर नसल्याने त्यानंतर केंद्र सुरू होईल असे त्यांना अधिकाऱ्याने सांगितल्यावर येत्या १२तारखेला संबंधित अधिकारी व शेतकरी यांची बैठक तहसीलदार कार्यालयात बोलावली असून त्यानंतर लगेच केंद्र सुरू होईल असे आश्वासन दिल्याने तोपर्यंत आंदोलन थांबवण्याची विनंती केल्याने तोपर्यंत आंदोलनाचा निर्णय थांबून त्यादिवशी पुढील घोषणा होणार आहे.
तूर व हरभरा केंद्र सुरू परवा सुरू करणेत येईल असे आश्वासन शेतकी संघाचे मनेजर यांनी दिले
या सोबत अवकाळीचेअनुदानाचे पैसे शासनाकडून जे डी सी सी कडे वर्ग झालेत परंतु शेतकऱ्यांना अद्याप दोन कोटी रुपये मिळाले नाहीत ते तात्काळ मिळावेत ते दोन दिवसात वर्ग होतील असे जे डी सी सी चे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी सांगितले.
भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना व्यापारी काहीही पैसे लाऊन लुटत आहेत ती थांबवली जावी.त्यात जागा भाडे अाडत व इतर खर्च लावला जातो त्यासंदर्भात बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.
सदर निवेदन दिल्यानंतर झालेल्या बैठकीत तहसीलदार अनिल गावीत, माजीआमदार कैलास बापू पाटील बाजारसमितीचे सभापती नारायण पाटील,शेतकरी कृती समितीचे एस बी पाटील,भागवत महाजन,तुकाराम पाटील,प्रकाश रजाळे,सुनील पाटील, स्वर्णसिंग राजपूत,रमेश सोनवणे,धनंजय पाटील,सुरेश पाटील,के बी पाटील,लवकेश पवार,संजय पाटील,संदीप महाजन,कुलदीप पाटील यांनी भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More